ऑस्ट्रेलिया पुरविणार भारताला युरेनियम

By Admin | Updated: September 6, 2014 01:44 IST2014-09-06T01:44:57+5:302014-09-06T01:44:57+5:30

भारत आणि ऑस्ट्रेलियाने बहुप्रतीक्षित अणु ऊर्जा करारावर शिक्कामोर्तब करून परस्परांतील संबंधाला नवीन आयाम दिला.

India will supply uranium to Australia | ऑस्ट्रेलिया पुरविणार भारताला युरेनियम

ऑस्ट्रेलिया पुरविणार भारताला युरेनियम

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियाने बहुप्रतीक्षित अणु ऊर्जा करारावर शिक्कामोर्तब करून परस्परांतील संबंधाला नवीन आयाम दिला. तसेच अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करताही भारताच्या अणु ऊर्जा कार्यक्रमासाठी युरेनियम मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. 
भारत भेटीवर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबट यांनी नवी दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  भेट घेऊन या कराराला अंतिम रुप दिले. भारतासोबत अत्यंत निकटचे संबंध प्रस्थापित करण्याचा मानसही यांनी व्यक्त केला. दोन्ही देशांदरम्यान संबंध व्यापार आणि रणनीतीक हितावर आधारित आहेत. भारताला युरेनियमची निर्यात करण्याच्या करारमुळे हे संबंध अधिकच दृढ होतील, असे टोनी अबॉट म्हणाले.
शुक्रवारी दुपारी टोनी अॅबट यांनी मोदी यांची भेट घेतली. यावेळी अॅबट यांनी मोदी यांना ऑस्ट्रेलियन लोकरीपासून तयार करण्यात आलेले ‘नेहरु ज्ॉकेट’ भेट दिले, तर मोदी यांनी त्यांना गीतेची प्रत भेट दिली. भारताच्या महत्त्वाकांक्षी अणु ऊर्जा कार्यक्रमासाठी भारताला युरेनियम निर्यात करण्यावरील बंदी मागे घेतल्यानंतर  2क्12 पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियम विक्रीबाबत वाटाघाटी सुरु झाल्या होत्या. युरेनियमच्या उत्पादनात ऑस्ट्रेलिया मोठा देश आहे. 

 

Web Title: India will supply uranium to Australia