शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

आरसीईपी करारावर भारत स्वाक्षरी करणार नाही, केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 21:38 IST

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी अर्थात RCEP करारामध्ये सामील होण्याबाबत भारताने मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली -  प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी अर्थात RCEP करारामध्ये सामील होण्याबाबत भारताने मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत उद्योगांचे व्यापक हित विचारात घेऊन या करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. या कराराला देशातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. 

\

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील विविध उद्योगांच्या मनात असलेल्या चिंतेची जाणीव आहे. त्यामुळेच देशांतर्गत उद्योग आणि शेतीच्या हितांबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याची भूमिका भारताने घेतली आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. आरसीईपी करार हा एक व्यापारी करार आहे. या करारावर स्वाक्षरी करून सदस्य झालेल्या देशाला अन्य देशांसोबतच्या व्यापारामध्ये अनेक सवलती मिळतील. या करारांतर्गत निर्यातीवर लागणारा कर द्यावा लागणार नाही किंवा द्यावा लागला तरी त्याचे प्रमाण फार कमी असेल. आरसीईपी करारामध्ये एशियानच्या 10 देशांसोबत अन्य 6 देशांचा समावेश आहे.  दरम्यान, आरसीईपी करारामध्ये भारताच्या सहभागी होण्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. काही शेतकरी संघटनांकडून या कराराला तीव्र विरोध होत होता. हा करार झाल्यास देशातील एक तृतियांश बाजार न्यूझीलंड, अमेरिका आणि युरोपियन देशांच्या ताब्यात जाईल. तसेच शेतकऱ्यांना सध्या मिळणाऱ्या उत्पादनाच्या किमतीत घट होण्याची भीती शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत होती.  भारत आरसीईपी करारामध्ये सामील झाल्यास देशातील कृषीक्षेत्रावर विपरित परिणाम होणार आहे. इतकेच नव्हे तर भारतातील डेअरी उद्योग पूर्णपणे डबघाईला येईल, अशी भीती अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समतीने चिंता व्यक्त करताना व्यक्त केली.  

''मी सर्व भारतीयांच्या हितसंबंधांच्यादृष्टीने आरसीईपी कराराराची उपयुक्तता पडताळून पाहिली. मात्र त्यातून मला काहीच सकारात्मक उत्तर मिलाले नाही. तसेच महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान आणि माझ्या अंतरात्म्याने मला आरसीईपीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली नाही,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय जाहीर करताना सांगितले. 

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार