शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

बोफोर्सचा ताबा असलेल्या कंपनीकडून भारत खरेदी करणार तोफा

By admin | Updated: November 17, 2016 13:21 IST

बोफोर्स तोफ तिच्या उपयुक्तततेपक्षा खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जास्त चर्चेत राहिली. आता ३० वर्षानंतर भारतीय लष्करात लवकरच अमेरिकन बनावटीच्या..

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १७ -बोफोर्स तोफ तिच्या उपयुक्ततेपेक्षा खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जास्त चर्चेत राहिली. आता ३० वर्षानंतर भारतीय लष्करात लवकरच अमेरिकन बनावटीच्या हॉवित्झरचा तोफांचा समावेश केला जाणार आहे. एम-७७७ हॉवित्झर तोफांची निर्मिती बीएई सिस्टीमने केली आहे. महत्वाची बाब म्हणजे बोफोर्स तोफाची निर्मिती करणारी स्विडीश कंपनी आता बीएईच्या नियंत्रणाखाली आहे.  पुढच्यावर्षी जून महिन्याच्या मध्यावर भारतीय लष्कराच्या ताफ्यात पहिली १५५ एमएम हॉवित्झर तोफ दाखल होऊ शकते. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अमेरिकेकडून १४५ एम-७७७ हॉवित्झर तोफांची खरेदी करण्याच्या व्यवहाराला मंजुरी दिल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. हा ५ हजार कोटी रुपयांचा व्यवहार आहे. 
 
या व्यवहारासाठी पेंटागॉनचे पत्र भारताला मिळाले असून, पुढच्या दोन ते तीन आठवडयात यासंबंधी करार होऊ शकतात. भारतात महिंद्रा कंपनी बीएईची व्यावसायिक भागीदार असणार आहे. करार झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात दोन होवित्झर तोफा दिल्या जातील.  त्यानंतर दर महिन्याला दोन तोफा मिळतील.