शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भारताने तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक वातावरणाचा लाभ घ्यावा, चीनच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 00:36 IST

China : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) ९ एप्रिलच्या चर्चेबाबत एक निवेदन जारी केले आहे.

बिजींग : पूर्व लडाखच्या उर्वरित भागांतून सैनिकांच्या वापसीबाबत भारत-चीन दरम्यानच्या चर्चेत यश मिळाल्यानंतर चीनने म्हटले आहे की, भारताने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी विद्यमान सकारात्मक वातावरणाचा लाभ घेतला पाहिजे.दोन्ही देशांत ११व्या फेरीची चर्चा १३ तास चालल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय लष्कराने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग, गोगरा व देपसांगमध्ये तणाव असणाऱ्या उर्वरित भागांतून सैनिकांच्या वापसीबाबत तपशीलवार चर्चा केली. शांतता राखणे, नवीन तणाव न वाढविणे व उर्वरित मुद्द्यांवर जलद गतीने तोडगा काढण्यावर सहमती झाली आहे.दरम्यान, याप्रक्रियेत असणाऱ्या व्यक्तींनी दिल्लीत सांगितले होते की, दोन्ही देशांत लष्करी चर्चा झाली असली तरी त्यात ठोस प्रगती झालेली नाही. कारण चीनचे शिष्टमंडळ पूर्वविचार करूनच चर्चेत सहभागी झाले होते. त्या देशाने संघर्षरत उर्वरित भागांमध्ये सैनिक मागे घेण्याच्या प्रक्रियेवर पुढचे पाऊल उचलण्याच्या दिशेने कोणतीही लवचिकता दाखविली नाही.चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) ९ एप्रिलच्या चर्चेबाबत एक निवेदन जारी केले आहे. फेब्रुवारीमध्ये पेंगाँग सरोवराच्या बहुतांश वादग्रस्त भागांत सैनिकांच्या वापसीकडे इशारा करीत म्हटले आहे की, भारताने सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दिशेने पुढे आले पाहिजे.वास्तविक नियंत्रण रेषेवर भारताच्या बाजूच्या चुशूल सीमा केंद्रावर झालेल्या चर्चेबाबत पीएलएने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देऊन चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने (सीजीटीएन) म्हटले आहे की, मागील चर्चेतील सहमतीवर दोन्ही देशांनी आता पुढचे पाऊल टाकण्याची गरज आहे. 

सीमेवर शांतता स्थापित करण्यासाठी पुढे यावेपीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, मागील चर्चांमध्ये झालेल्या सहमतीचे पालन करून सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी विद्यमान सकारात्मक वातावरणाचा भारत लाभ घेईल. त्याचबरोबर सीमेवर शांतता स्थापित करण्याच्या दिशेने पुढे येईल, अशी आशा आहे. कारण चीनही त्याच दिशेने पुढे सरकत आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाख