शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

भारतानं बलुचिस्तानला स्वतंत्र करावे - नायला कादरी

By admin | Updated: October 12, 2016 19:53 IST

भारत तिबेट आणि बांगलादेशसारखा आम्हालाही न्याय मिळवून देईल अशी आशा आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - बलुचिस्तानच्या नेत्या नायला कादरी या सध्या दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्यानंतर एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बातचीत करताना बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला आहे. "आंतरराष्ट्रीय स्तरावर काही गोष्टी वेगाने बदलत आहेत. भारत तिबेट आणि बांगलादेशसारखा आम्हालाही न्याय मिळवून देईल अशी आशा आहे", असंही त्या म्हणाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बलोच गव्हर्नरचं समर्थन केलं पाहिजे. भारतानं बलुचिस्तानच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकही बोलावून, बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून द्यायला हवं, असंही त्या म्हणाला आहेत.

नायला कादरी यांचा मुलगा मझदाक दिलशाद हे आधीपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी आग्रही असून, त्यादृष्टीनं त्यांनी प्रचारही सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तानमध्ये होणा-या अन्यायाचा उल्लेख केल्यानं गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भारताचा तिरंगा डौलानं फडकला होता. पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळलेल्या बलूची लोकांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिल्या होत्या. विशेष म्हणजे बलुचिस्तानमधले शहीद म्हणून ओळखले जाणारे नेते अकबर बुगती यांच्या फोटोसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही झळकले. त्यामुळे पाकिस्तानला पोटशूळ उठलं.

बलुचिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून होणा-या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू आहे. आक्रमक झालेल्या बलूची लोकांनी पाकिस्तानचा झेंडाही तुडवला होता. तसेच सुई, डेरा बुगती, जाफराबाद, नसिराबादसह बलुचिस्तानच्या इतर भागांतही पाकिस्तानच्या अन्यायाविरोधात जोरदार आंदोलनं सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी बलुचिस्तान, गिलगिलत-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना आपले आभार मानले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधल्या प्रभावशाली नेत्या नायला कादरी यांनी भारताकडे बलुचिस्तानला स्वतंत्र करावं, अशी मागणी केली आहे.