शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 06:07 IST

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या यादीत आठव्या क्रमांकावर असून, त्यांना ४४ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला. पंतप्रधान मोदींचे किती टक्के लोकांनी समर्थन केले?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सन २०१४, २०१९ आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ‘जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यां’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्थेने या संदर्भातील सर्वेक्षण केले असून, त्यात तब्बल ७५ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली; तर १८ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीला विरोध केला आणि सात टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.

पंतप्रधान मोदींनंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेव्हिअर मिलेई अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने  अनेक देशांतील नागरिकांच्या प्रतिक्रियांद्वारे हे सर्वेक्षण केले आहे. दरम्यान, भाजपचे आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणाचे तपशील शेअर करत म्हटले की, १०० कोटींपेक्षा अधिक भारतीयांचा विश्वास आणि जगातील लक्षावधी नागरिकांनी सन्मान केल्याने मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वांत लोकप्रिय व विश्वासार्ह नेते ठरले आहेत.  

डोनाल्ड ट्रम्प घसरले आठव्या क्रमांकावर

दरम्यान, ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या यादीत आठव्या क्रमांकावर असून त्यांना ४४ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. जागतिक स्तरावरील आणि देशांतर्गत धोरणांमुळे त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाल्याचे मानले जाते. यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी असून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानिज पाचव्या क्रमांकावर आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी दहाव्या क्रमांकावर आहेत.

मोदींनी इंदिरा गांधी यांचा विक्रमही काढला मोडीत 

दरम्यान, याच आठवड्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रमदेखील मोडला आहे. सलग ४०७८ दिवस पंतप्रधान पदावर कार्यरत राहून त्यांनी इंदिरा गांधींच्या सलग ४०७७ दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत