Video - हृदयस्पर्शी! कोणी सायकल दिली, तर कोणी पिगी बँक फोडली; इराणसाठी चिमुकल्यांचं मोठं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 10:32 IST2026-03-30T10:31:09+5:302026-03-30T10:32:03+5:30
भारताच्या विविध भागांतून मानवतेच्या हृदयस्पर्शी गोष्टी समोर येत आहेत. लडाखमधील लेहपासून ते जम्मू-काश्मीरमधील चंदरकोट आणि बडगामपर्यंत, लोक युद्धग्रस्त इराणसाठी सढळ हाताने मदत करत आहेत.

Video - हृदयस्पर्शी! कोणी सायकल दिली, तर कोणी पिगी बँक फोडली; इराणसाठी चिमुकल्यांचं मोठं मन
युद्धामुळे झालेला विनाश केवळ सीमेपुरता मर्यादित राहत नाही, त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. पण हेच दुःख कमी करण्यासाठी काही संवेदनशील हात पुढे येत आहेत. सध्या असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे, जिथे भारताच्या विविध भागांतून मानवतेच्या हृदयस्पर्शी गोष्टी समोर येत आहेत. लडाखमधील लेहपासून ते जम्मू-काश्मीरमधील चंदरकोट आणि बडगामपर्यंत, लोक युद्धग्रस्त इराणसाठी सढळ हाताने मदत करत आहेत.
लेहमधून मानवतेचं दर्शन घडवणारी अशीच एक घटना समोर आली आहे. लेहमध्ये लोक पैसे, मौल्यवान धातू, दागिने आणि जीवनावश्यक वस्तू दान करत आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका लहान मुलीने आपली पिगी बँक फोडून त्यात जमा केलेले पैसे मदतकार्यासाठी दिले आहेत. इतकंच नाही तर अनेक मुलांनी आपल्या सायकली सुद्धा दान केल्या आहेत.
#WATCH लेह, लद्दाख | लेह में ईरान के निवासियों की मदद के लिए नियमित रूप से दान अभियान चलाए जा रहे हैं। ईरान अमेरिका-इजरायल के हमलों से प्रभावित है। इन अभियानों में पैसे, कीमती धातु के आभूषण और अन्य मूल्यवान वस्तुओं का योगदान शामिल है। इसी बीच, एक छोटी बच्ची ने भी राहत कार्यों में… pic.twitter.com/KkXeFPBduX
— ANI_HindiNews (@AHindinews) March 30, 2026
लडाखमध्ये गेल्या ३० दिवसांपासून सतत 'डोनेशन ड्राइव्ह' सुरू आहे. गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी लोक नियमितपणे मदत साहित्य गोळा करत आहेत. यापूर्वी असंच दृश्य जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील चंदरकोटमध्येही पाहायला मिळालं होतं. येथे लोकांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त दान दिलं. कोणी पैसे दिले, तर कोणी भांडी, सोनं आणि चांदी दिली.
इराणच्या मदतीसाठी लहान मुलांनी आपली पिगी बँक फोडले. महिलांनी स्वतःचे दागिने, बांगड्या आणि झुमके दान केले. अगदी काही लोकांनी तर आपल्या मुलांच्या अंगावरील दागिनेही काढून दिले. एका व्यक्तीने आपली मेंढी दान केली, जेणेकरून कोणा गरजूला मदत होऊ शकेल. भारतीयांच्या या भावना पाहून भारतातील इराणी दूतावासही भावूक झालं आहे. "आम्ही तुमची दयाळूवृत्ती आणि मानवता कधीही विसरणार नाही. धन्यवाद, भारत" असं त्यांनी म्हटलं आहे.