भारतानेच घडवला उरीमधील हल्ला

By Admin | Updated: September 21, 2016 06:36 IST2016-09-21T06:36:23+5:302016-09-21T06:36:23+5:30

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताविरुद्ध आरोप करीत आहे

India created the Uri attack | भारतानेच घडवला उरीमधील हल्ला

भारतानेच घडवला उरीमधील हल्ला


नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताविरुद्ध आरोप करीत आहे. काश्मिरात शीख-मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करण्यासाठीच भारतानेच हा हल्ला घडवून आणला, असा अजब दावा मंगळवारी पाकिस्तानने केला आहे. न्यूज इंटरनॅशनलने हे मत व्यक्त केले आहे.
या वृत्तपत्राने म्हटले आहे की, काश्मिरातील मुस्लिमांच्या संघर्षाला शिखांचा पाठिंबा आहे. उरीचे हे ब्रिगेड मुख्यालय निवडण्यामागेही हेच कारण आहे. पाकच्या सुरक्षा विभागातील सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितले की, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी
शिखांनी नेहमीच मुस्लिमांचे समर्थन केलेले आहे, तर हिंदूंच्या नेतृत्वातील सरकारने अशा घडवून आणलेल्या हल्ल्यांत शीख समुदायाचे
नुकसान झाले आहे. उरीच्या या हल्ल्यामागे भारताचे अनेक हेतू होते, असा जावईशोधही लावलेला आहे.
काश्मिरात सुरक्षा दलाकडून ज्या हत्या होत आहेत त्यापासून जगाचे लक्ष विचलित करण्याचाही हा एक प्रयत्न आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत नवाज शरीफ यांचे महत्त्व कमी करणे आणि शीख व मुस्लिम यांच्यात द्वेष निर्माण करणे हे भारताचे हेतू आहेत, असेही यात म्हटले आहे.

Web Title: India created the Uri attack