शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: पंतप्रधान मोदी वास्तविक पाहता सरेंडर मोदी -राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:26 IST

याच्या पुष्ठ्यर्थ राहुल गांधी यांनी सोबत एका वृत्त वाहिनीवरील बातम्यांची फित जोडली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वास्तविक पाहता ‘सरेंडर मोदी’ आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी भारतीय भूभाग चीनच्या हवाली केल्याचा आरोप त्यांनी आदल्या दिवशी केल्यानंतर रविवारीही त्यांनी टष्ट्वीट करुन ‘सरेंडर मोदी’ असे संबोधले. तसेच एका विदेशी नियतकालिकातील ‘चीनप्रति भारताचे अनुनय धोरण उघड’ या शीर्षकाखालील लेख आणि दूरचित्रवाणीवरील बातम्यांची फीतही जोडली आहे.नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने शरणागत मोदी (सरेंडर मोदी) आहेत. पंतप्रधान म्हणतात की, कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही आणि कोणीही भारताच्या भागावर कब्जा केला नाही, परंतु, उपग्रहामार्फत मिळालेल्या छायाचित्रानुसार चीनने लडामधील पँगॉग त्सो सरोवरानजीक भारताच्या पवित्र भूमीवर कब्जा केल्याचे स्पष्ट दिसते, असे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. तसेच याच्या पुष्ठ्यर्थ राहुल गांधी यांनी सोबत एका वृत्त वाहिनीवरील बातम्यांची फित जोडली आहे.भारत-चीन तणावावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही, तसेच कोणीही आमच्या चौकीवर कब्जा केलेला नाही. त्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, चीनच्या आक्रमतेपुढे पंतप्रधानांनी भारतीय भूभाग चीनच्या हवाली केला. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने प्रत्यक्ष ताबा रेषेसंबंधी पंतप्रधानांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देतांना म्हटले की, त्यांच्या विधानाचा विपर्यास्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या टीकेनंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या पंतप्रधानांवर अशा प्रकारची टीका शोभत नाही, असे पक्षाने म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी