India China FaceOff: इंच-इंच भूमी लढवण्यासाठीच लष्कराला मुक्त कारवाईची मुभा; चीनविरोधात युद्धाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 06:13 AM2020-06-22T06:13:58+5:302020-06-22T06:15:01+5:30

India China FaceOff: गलवान खोऱ्यातील झटापटीत भारतीय जवानांवर तार गुंडाळलेल्या दांडुक्याने भ्याड हल्ला पीएलएच्या सैनिकांनी केल्यामुळे हा बदल होण्याची शक्यता आहे.

India China FaceOff: Allowing the army free action to fight inch-by-inch land; Preparing for war against China | India China FaceOff: इंच-इंच भूमी लढवण्यासाठीच लष्कराला मुक्त कारवाईची मुभा; चीनविरोधात युद्धाची तयारी

India China FaceOff: इंच-इंच भूमी लढवण्यासाठीच लष्कराला मुक्त कारवाईची मुभा; चीनविरोधात युद्धाची तयारी

googlenewsNext

टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : चिनी ड्रॅगनचा उद्दामपणा ठेचून काढण्याची पूर्ण तयारी भारताने केली आहे. लष्करी सामर्थ्यात भिन्नता असली तरी इंच-इंच भूभागाच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करास दिले. तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसमवेत त्यांची दिल्लीत चर्चा झाली. झटापटीत हत्यार न वापरण्याच्या करारातही बदल करण्यावर भारताकडून विचार सुरू आहे. मात्र त्यास दुजोरा मिळाला नाही. गलवान खोऱ्यातील झटापटीत भारतीय जवानांवर तार गुंडाळलेल्या दांडुक्याने भ्याड हल्ला पीएलएच्या सैनिकांनी केल्यामुळे हा बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारताकडून थेट युद्धसज्जतेचा इशारा दिल्यासारखे होईल, त्यामुळे या निर्णयावर चर्चा सुरू आहे.
>आपल्याही ताब्यात चिनी जवान?
चीनचे दात घशात घालण्यासाठी भारतीय लष्करानेही लद्दाख सीमेवर शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. ड्रॅगन कितीही फुत्कारला तरी उत्तर देण्यास लष्कर सज्ज आहे. ‘१५ जूनला झालेल्या झटापटीत चीनचे जवानही मारले गेले. त्यांचे जवान अद्याप आपल्या ताब्यात आहेत. आपण काही जवानांना सोडल्यानंतर त्यांनी आपल्या जवानांना सोडल्याचा खळबळजनक दावा, माजी लष्करप्रमुख वी. के. सिंह यांनी केला. घुसखोरीचा कट रचणाºया चीनचे मनसुबे लष्कराने उद्ध्वस्त करून चिनी सैन्याला यातून कठोर संदेश दिला.
>पेगाँग सरोवराभोवती घिरट्या
आता ड्रॅगन पेगाँग सरोवराभोवती घिरट्या घालत आहे. तर भारतीय हद्दीत इंचभर पाऊल चीनने सरकवले तरी हवे तसे प्रत्युत्तर देण्याची मुभा भारतीय लष्करास केंद्राने दिली आहे. चीनचा कावेबाजपणा सुरूच आहे. भारताची इंडो तिबेट सीमा पोलिसांच्या जवानांना लद्दाखमध्ये पाठवण्याची तयारी आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असणाºया जवानांनी संख्या वाढवली जाणार आहे. सध्या विविध सीमेवर १८० पोस्टवर हे जवान तैनात आहे. एकूण २ हजार जवानांना सीमेवर तैनात केले जातील.
>५०० कोटींपर्यंत साहित्य खरेदीची परवानगी
संरक्षण सज्जतेसाठी संरक्षण मंत्रालयाने लष्करात ५०० कोटी रुपयांपर्यंत साहित्य खरेदीची परवानगी दिली आहे. त्यात जवानांच्या पोषाखापासून काही हत्यारांचाही समावेश आहे. ही खरेदी तात्काळ केली जाईल.
लष्कराने इतर सीमांवरही गस्त वाढवली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ईशान्येकडील राज्यांमध्ये जवानांची संख्या वाढली असून सागरी सीमेवरही युद्धनौका सज्ज आहेत. हा निर्णय संरक्षण मंत्री व लष्कर प्रमुखांच्या बैठकीत झाला. श्रीनगरमध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले.

Web Title: India China FaceOff: Allowing the army free action to fight inch-by-inch land; Preparing for war against China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.