शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांमुळे बिघडणार गणित?; बिहारच्या 3 महत्त्वाच्या मतदारसंघांमधील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 05:45 IST

बिहारच्या पूर्णिया, काराकाट, महाराजगंज, नवादा मतदारसंघांमधील चित्र

एस.पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये लोकसभा निवडणुकांत अपक्ष हे राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मार्गातले काटे बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्णिया, काराकाट, महाराजगंज, नवादा आदी मतदारसंघांमध्ये हे चित्र दिसू शकते असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पूर्णिया मतदारसंघात बंडखोर उमेदवार पप्पू यादव हे राजदच्या उमेदवार बीमा भारती यांच्या विजयाची शक्यता कमी करू शकतात.

काराकाट लोकसभा मतदारसंघात भोजपुरी अभिनेता पवन सिंह हे निवडणूक रिंगणात उतरल्याने एनडीएच्या गोटात अस्वस्थता आहे. काराकाटमध्ये एनडीएचे उमेदवार व राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्याविरोधात इंडिया आघाडीतर्फे राजारामसिंह हे लढत देत आहेत. नवादा लोकसभा मतदारसंघात राजदच्या दोन आमदारांनी पक्षाचे उमेदवार श्रवण कुशवाह यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार विनोद यादव यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. भोजपुरी अभिनेता विनोज यादव हेही अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून त्यामुळे राजदची चिंता वाढली आहे. महाराजगंज मतदारसंघात भाजप व काँग्रेस यांच्यातच चुरशीची लढत होईल. भाजपतर्फे जनार्दनसिंह सिग्रीवाल हे उमेदवार असून काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. विधान परिषदेचे सदस्य सच्चिदानंद राय या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेस हे दोन्ही पक्ष चिंताग्रस्त झाले आहेत.

तिकीट वाटपावरुन लालुंच्या पक्षामध्ये नाराजीलाेकसभेचे मतदान काही दिवसांवरच येऊन ठेपले आहे. राजकीय पक्षांनी पहिल्या दाेन टप्प्यांसाठी तिकीटवाटप जाहीर केले आहे. बिहारमध्ये लालुप्रसाद यादव यांच्या राजदला २३ जागा मिळाल्या आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या तिकीटवाटपावरुन पक्षात नाराजी दिसत आहे. त्याचा किती फायदा महाआघाडीला हाेताे, यावर पक्षाचे नेतेच प्रश्नचिन्ह उपस्थित करु लागले आहेत.कटिहारमध्ये माजी राज्यसभा सदस्य अशफाक करिम यांना लाेकसभेची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. त्याचवेळी पूर्णियामधून बंडखाेरी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पप्पू यादव यांच्याविराेधात राजदने उमेदवार उभा केला आहे. यावरुनही अशफाक यांनी लालुंवर टीका केली आहे.

लालूंच्या खेळीचा एनडीएला फायदा?nबिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या प्रभावाखाली झालेल्या जागावाटपाचा फायदा महाआघाडीपेक्षा एनडीएला होत असल्याचे दिसते. भागलपूरची जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे, परंतु १९८४ पासून काँग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही.nऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निखिल कुमार हे काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपचे उमेदवार सुशील सिंह यांना कडवी टक्कर देऊ शकतात. पण आरजेडीने ही जागा आपल्याकडे घेऊन कमकुवत उमेदवार उभा केला. पूर्णियातून पप्पू यादव यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही.nनवाडा येथेही आरजेडीने श्रावण कुशवाह यांना उमेदवारी दिली. परंतु त्यांचा आमदारकी आणि विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला होता.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४