शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
"मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
4
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
5
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
6
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
7
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
8
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
9
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
10
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
11
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
12
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
13
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
14
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
15
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
16
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
17
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
18
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
19
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
20
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
Daily Top 2Weekly Top 5

‘नोटाबंदी’नंतर सायबर हल्ल्यांत वाढ

By admin | Updated: January 25, 2017 00:49 IST

‘नोटाबंदी’ लागू झाल्यानंतर मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशभरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर चोरांनी त्यांचा मोर्चा स्मार्टफोन आणि विशेषत: अ‍ॅण्ड्रॉइड फोनकडे वळविला आहे.

मुंबई : ‘नोटाबंदी’ लागू झाल्यानंतर मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशभरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर चोरांनी त्यांचा मोर्चा स्मार्टफोन आणि विशेषत: अ‍ॅण्ड्रॉइड फोनकडे वळविला आहे. परिणामत: गेल्या दोन महिन्यांपासून अ‍ॅण्ड्रॉइड फोनवरील सायबर हल्ल्यांत मोठी वाढ झाल्याचे ‘एफ-सिक्युअर’ या आघाडीच्या युरोपीय सायबर सुरक्षा कंपनीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
कंपनीने ‘थ्रेट लँडस्केप इंडिया २०१६ अ‍ॅण्ड बियॉण्ड’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. नोटाबंदीनंतर २०१७मध्ये भारतातील पॉइंट आॅफ सेल (पीओएस) आणि बँकिंग मालवेअर्स विशेषत: मोबाइल वॉलेट्सना मोठा धोका असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात संगणकापेक्षा मोबाइलवरून इंटरनेटचा अधिक वापर करण्यात येतो. त्यातही नोटाबंदीनंतर मोबाइल वॉलेट्स वापरामध्ये मोठी वाढ झाली असून, त्यात ‘टेल्को बॅक्ड वॉलेट्स, स्वतंत्र वॉलेट्स, बँकेचा पाठिंबा असलेल्या वॉलेट्स’चा अधिक वापर होत आहे.
प्रत्येक विक्रेत्याकडे वेगवेगळी वॉलेट्स वापरली जात असल्यामुळे लोक मोबाइलमध्ये विविध वॉलेट अ‍ॅप्स ठेवत आहेत. त्यामुळे सायबर हल्ल्याच्या धोक्यांमध्येही वाढ झाली आहे, असेही अहवालात म्हटले आहे. (प्रतिनिधी)