शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
3
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
4
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
5
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
6
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
7
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
8
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
9
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
10
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
11
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
12
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
13
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
14
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
15
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
16
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
17
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
18
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
19
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:13 IST

पश्चिम आशियातील लाल समुद्र, बाब-अल-मंदेब, होर्मुझ सामुद्रधुनी, सुएझ कालवा हे अरुंद सागरी मार्ग डिजिटल चोकपॉइंट्स म्हणूनही कार्य करतात.

मेलबर्न : होर्मुझ सामुद्रधुनीत समुद्राखाली टाकण्यात आलेल्या इंटरनेट केबल्सच्या ऑपरेटरांकडून इराणी सागरी क्षेत्रात प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव इराण सरकारने मांडला. इराणच्या वक्तव्यामुळे इंटरनेट आणि जागतिकीकरणाच्या त्या अदृश्य पायाभूत रचनेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. तिथे समुद्राखाली ५००हून अधिक केबलचे जाळे असून त्याच माध्यमातून जगातील ९५ टक्क्यांहून अधिक आंतरराष्ट्रीय डेटा वाहतूक चालते.

पश्चिम आशियातील लाल समुद्र, बाब-अल-मंदेब, होर्मुझ सामुद्रधुनी, सुएझ कालवा हे अरुंद सागरी मार्ग डिजिटल चोकपॉइंट्स म्हणूनही कार्य करतात. हे सागरी मार्ग युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील आर्थिक केंद्रांना जोडतात. २०२४ मध्ये तांबड्या समुद्रातील समुद्री केबल्सशी संबंधित घटनांमुळे युरोप व आशियामधील सुमारे २५ टक्के इंटरनेट सेवेवर परिणाम झाला होता. अनेक केबल्स या प. आशियातील अर्थकारणासाठी महत्त्वाच्या दुवा आहेत. 

डिजिटल पायाभूत सुविधा

पूर्वी महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये तेलवाहिन्या, बंदरे किंवा वीज ग्रिड यांचा समावेश होत असे; मात्र आता डेटा पायाभूत सुविधाही राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षेसाठी तितक्याच महत्त्वाच्या बनल्या आहेत. 
समुद्राखालील केबल्समधील मोठी समस्या म्हणजे पायाभूत सुविधांचे केंद्रीकरण. अनेक केबल्स समुद्रतळावर एकाच मार्गाने जातात आणि काही मोजक्या सागरी चोकपॉइंटस्मधून बाहेर पडतात. एखादी केबल तोडण्यात आल्यास अनेक देशांमधील संपर्क व्यवस्था त्याने बाधित होऊ शकते. 

या क्षेत्रांना अधिक फटका 

पर्यायी पायाभूत सुविधा कमी असल्याने आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियातील विकसनशील देशांना सर्वाधिक फटका बसू शकतो.  आर्थिक बाजारपेठाही यापासून सुरक्षित राहणार नाहीत. जागतिक पेमेंट नेटवर्क्स आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहार विस्कळीत होतील. 

विमा, जहाज वाहतूक उद्योग आणि ऊर्जापुरवठा साखळ्यांनाही मोठ्या अनिश्चिततेला सामोरे जावे लागेल.  ड्रोन ऑपरेशन्स, रसद नियोजनापर्यंत लष्करातील प्रत्येक यंत्रणांना याचा फटका बसू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's toll on internet? Undersea cables threaten data services.

Web Summary : Iran's proposed fee for accessing undersea internet cables raises concerns. Over 500 cables carry 95% of global data. Disruptions in key chokepoints like the Red Sea can severely impact internet services, especially in developing nations, affecting economies and military operations.
टॅग्स :IranइराणInternetइंटरनेट