शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित एनआयएकडून आसाम हिंसाचाराची चौकशी राजनाथसिंग यांची घोषणा: बळीसंख्या ७८

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

गुवाहाटी/सोनितपूर :आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्‘ांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असून राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) या बंडखोरांनी घडवून आणलेल्या निघृर्ण हत्याकांड व हिंसाचाराची चौकशी करणार आहे़ उल्फाविरुद्धच्या मोहिमेच्या धर्तीवर एनडीएफबी-एसविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी भूतान सरकारशी संपर्क करण्याचा विचारही सरकारने चालवला आहे़

गुवाहाटी/सोनितपूर :आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असून राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) या बंडखोरांनी घडवून आणलेल्या निघृर्ण हत्याकांड व हिंसाचाराची चौकशी करणार आहे़ उल्फाविरुद्धच्या मोहिमेच्या धर्तीवर एनडीएफबी-एसविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी भूतान सरकारशी संपर्क करण्याचा विचारही सरकारने चालवला आहे़
एनडीएफबी-एस बंडखोरांनी आसामच्या दुर्गम भागातील तीन जिल्ह्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सोनितपूर जिल्ह्यातील ३७, कोकराझर येथील २५ आणि चिरांग जिल्ह्यात तीन जण ठार झाले होते. या हत्याकांडाविरुद्ध आदिवासींनी सुरूकेलेले आंदोलन सोनितपूर जिल्ह्याच्या धेकियाजुलीमध्ये हिंसाचारझाल्यानंतर पोलिसांना काल बुधवारी गोळीबार करावा लागला होता़ त्यात तिघे ठार झाले होते़ आज गुरुवारी कोकराझारच्या गोसाईगावा येथे आदिवासींनी बोडो सुमदायाच्या घरांना आगी लावल्या़ आणखी सहा मृतदेह सापडल्यानंतर या हिंसाचारातील बळींची संख्या आता ७८ वर पोहोचली आहे़
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गुरुवारी हिंसाचारप्रभावित सोनितपूरचा दौरा केल़ा़ या दौऱ्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत, या हिंसाचाराची चौकशी एनआयएकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली़ मी याबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली़ या संपूर्ण हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी केली जाईल़ बोडो बंडखोरांना शह देणाऱ्यांबाबत कळायला हवे़ हा केवळ हिंसाचार नाही तर अतिरेकी कृत्य आहे़ हा दहशतवाद सरकार कदापि सहन करणार नाही़ एनडीएफबी(एस)विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले़ एनडीएफबी(एस) निश्चितपणे मोहीम छेडली जाईल़ मात्र कधी हे तूर्तास सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले़

कोट
आसामातील हिंसाचार सरकारने अत्यंत गंभीरपणे घेतला आहे़ त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल़
- राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री

बॉक्स
हवी भूतानची मदत!
गुवाहाटी: डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड(एनडीएफबी-एस) बंडखोरांवर अंकुश आणण्यासाठी भूतानची मदत घेण्याचा विचार सरकारने चालवला आहे़ याप्रकरणी तात्काळ भूतानच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे विनंतीवजा आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केल्याचे कळते़
गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काल बुधवारी रात्री राजनाथसिंग यांनी स्वराज यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली व तात्काळ भूतानची मदत घेण्याचे आवाहन केले़ एनडीएफबीने भारत-भूतान सीमेवरील घनदाट जंगलात आपली काही ठिकाणे तयार केल्याचे मानले जाते़ भारतीय सुरक्षा दलांनी मोहीम उघडताच, एनडीएफबी बंडखोर पळून भूतान भागात दडून बसतात़ यामुळे त्यांच्यासोबत लढा देणे कठीण होते़
सन २००३-०४ मध्ये भूतानने उल्फाविरुद्ध मोहीम चालवून त्यांना आपल्या देशातून हाकलले होते व त्यांची सारी ठिकाणे नष्ट केली होती़