शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

दिल्लीत अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक सुरू, मुख्यमंत्री ठाकरेंसह पोलीस महासंचालकही हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 11:15 AM

देशातील वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली असून सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत बैठक चालणार आहे.

ठळक मुद्देया बैठकीत राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. 

नवी दिल्ली - देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडत असून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळेच, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले असून त्यांच्यासमेवत मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे हेही या बैठकीला उपस्थित आहेत.

देशातील वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली असून सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत बैठक चालणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं नक्षलवाद प्रभावित राज्यांतील मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यासाठी या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. 

आजच्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलगंणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री, बंगालचे मुख्य सचिव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीनंतर अमित शहांशी स्वतंत्रपणे भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरे