शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळा कोरोना घोटाळा: कोरोना चाचणी केलेल्यांच्या यादीत चक्क 'गुटखा' अन् 'चंपू' नावांचा समावेश! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 12:56 IST

उत्तराखंडमध्ये कुंभमेळा दरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडमध्ये कुंभमेळा दरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुंभमेळा काळात जवळपास १ लाख खोट्या आरटीपीसीआर चाचण्या करुन दिशाभूल करणारा अहवाल तयार करण्यात आला होता. यात कोरोना चाचणी करण्यात आलेल्या व्यक्तींच्या यादीत चक्क 'चंपू' आणि 'गुटखा' अशा नावांचा उल्लेख करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. तब्बल १ लाख जणांच्या नावांची यादीत तयार करत असताना सामान्य स्वरुपाची नावं संपल्यानंतर यादीत चक्क 'गुटखा', 'चंपू' नावांचा उल्लेख करुन फक्त आकडा दाखवण्यासाठीचा खेळ केला गेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे ज्यांचे मोबाइल क्रमांक अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यांच्या मोबाइलवर कोरोना चाचणीचा अहवाल पोहोचल्यानंतर ते देखील चक्रावून गेले आहेत. ज्यांना असे मेसेजेस आले त्यांनी हा काहीतरी स्पॅम मेसेज आहे, असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं समोर आलं आहे. "माझ्या मोबाइलवर मला मेसेज आला की तुमचा कोरोना चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहे. पण मी कोरोना चाचणीसाठी नमुनाच दिला नव्हता. कोणतीही चाचणी मी केली नव्हती. त्यामुळे माझ्यासह संपूर्ण कुटुंब घाबरुन गेलो होतो. अधिकारी येऊन आम्हा सगळ्यानं कुठंतरी घेऊन जातील आणि काही कारण नसताना क्वारंटाइन करतील", असं हरिद्वारचे गुलाम मोहम्मद यांनी सांगितलं. 

'चंपू' आणि 'गुटखा' नावांचा उल्लेखकुंभमेळ्यातील कोरोना चाचणीचं काम खासगी एजन्सीला देण्यात आलं होतं. अहवालात बहुतेक नावांच्या आडनावाचा उल्लेख नव्हता. तर काही जणांचं नाव चक्क 'चंपू' आणि 'गुटखा' असं नमूद करण्यात आलं होतं. आरोग्य विभागाकडून ही यादी समोर आली आहे. कुंभमेळ्यादरम्यान सरकार व्यतिरिक्त ९ खासगी एजन्सीला देण्यात आलं होतं. कुंभमेळ्यात दिवसाला ५० हजार कोरोना चाचण्या करण्याचे आदेश हायकोर्टानं दिल्यानंतर या खासगी एजन्सीची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली होती. 

एका खासगी एजन्सीविरोधात १ लाख फेक चाचण्या केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांकडून कोरोना चाचणीसाठीचे नमुने जमा करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि अहवाल मात्र खोटे सादर करण्यात आले होते. यात नाव आणि पत्ता सारंकाही खोटं असल्याचं निदर्शनास आलं आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाcorona virusकोरोना वायरस बातम्या