तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही, बबिताने दिले सडेतोड उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 09:13 PM2020-04-17T21:13:39+5:302020-04-17T21:16:52+5:30

फोगट यांनी सडेतोड उत्तर देत मी तुमच्या धमक्यांना घाबरायला झायरा वसीम नसल्याचे सांगितले आहे. 

I'm not Zaira Wasim to scare your threats, Babita's quick answer pda | तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही, बबिताने दिले सडेतोड उत्तर 

तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही, बबिताने दिले सडेतोड उत्तर 

Next
ठळक मुद्देतबलिगी जमातने कोरोनाचा संसर्ग केला नसता तर आतापर्यंत लॉकडाउन संपला असता आणि भारताने कोरोनाला हरवलं असतं.मी तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणारी नाही. मी बबिता फोगट आहे. नेहमी आपल्या देशासाठी लढली आहे आणि असं लढतच राहणार.

नवी दिल्ली - देशात कोरोना रुंगांची संख्या तबलिगी जमातीमुळे वाढत असल्याचे वादग्रस्त ट्वीट भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगट यांनी केले होते. सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत असून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. या पोस्टवरून समजत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्राकरणी तिच्यावर जोरदार टीका होत आहे.  2019 च्या हरयाणा राज्याच्या निवडणूकीत भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या बबिताच्या समर्थनात देखील काहींनी ट्विट केलं आहे.

ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही बबिताचे समर्थन केले. त्यात बबितानं शुक्रवारी एक व्हिडीओ पोस्ट करून तबलिगींवर निशाणा साधला आहे. मात्र, त्यावरच न थांबता फोगट यांना फोन आणि मेसेज करून धमकावलं जात आहे. त्यावरही फोगट यांनी सडेतोड उत्तर देत मी तुमच्या धमक्यांना घाबरायला झायरा वसीम नसल्याचे सांगितले आहे.  फोगट यांच्या ट्वीटनंतर अनेकजणांनी बबिता फोगटचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी केली आहे. तसेच तिला फोन, मेसेज करुन धमकावलंही जात आहे. बबिता फोगटने धमकावणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी मी ट्वीट केले होते. त्यानंतर अनेकजण मला फेसबुक, ट्विटरला मेसेज पाठवून शिवीगाळ करत आहेत. तसेच काही फोन करून धमकावत आहेत. मात्र, मी या सगळ्यांना सांगते, तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही. मी तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणारी नाही. मी बबिता फोगट आहे. नेहमी आपल्या देशासाठी लढली आहे आणि असं लढतच राहणार. मी माझ्या ट्विटमध्ये काहीही चुकीचं लिहिलेलं नाही.

मी केलेल्या ट्वीट ठाम आहे आणि यापुढेही राहणार. तबलिगी जमातने कोरोनाचा संसर्ग केला नसता तर आतापर्यंत लॉकडाउन संपला असता आणि भारताने कोरोनाला हरवलं असतं. ज्यांना सत्य ऐकण्यास त्रास होतो त्यांना मला सांगायचं आहे, मी सत्य बोलत राहणार आणि लिहीत राहणार. तुम्हाल सत्य ऐकायला आवडत नसेल तर तुम्ही आपली सवय बदला अथवा सवय लावून घ्या, असे खडेबोल बबिता फोगटने टीकाकारांना सुनावले आहे.

 

Corona Virus : 'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या व्हिडीओने खळबळ, ‘तबलिगी जमात’वर प्रक्षोभक टीकास्त्र

Web Title: I'm not Zaira Wasim to scare your threats, Babita's quick answer pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.