शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

रिपोर्ट! ९० च्या दशकात वर्षातील ३११ दिवस मिळायची शुद्ध हवा, आता मिळते फक्त २३६ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:01 IST

आयआयटी दिल्ली अहवालात ‘एक्स्पोजर बायस’बाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या फोनवर दिसणारा (हवेचा गुणवत्ता निर्देशांक) पूर्ण सत्य सांगत नाही.

नवी दिल्ली - देशातील हवेत प्रदूषणाचे ‘विष’ अशा रीतीने भिनले आहे की, आता वर्षातील एक तृतीयांश काळ आपल्याला प्रदूषित हवेतच श्वास घ्यावा लागत आहे. आयआयटी दिल्ली आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञांनी तयार केलेल्या ताज्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. 

अहवालानुसार, १९८७ ते २०२४ या काळात ६४ शहरांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता, ९० च्या दशकात वर्षातील १५% दिवस ‘गंभीर’ श्रेणीतील प्रदूषण सहन करावे लागत होते. मात्र, आता हा आकडा ३५ टक्के झाला आहे.

३८ वर्षांच्या प्रवासाचे ३ टप्पे१९८७-१९९३ (ताजेतवाने दिवस) : या काळात वर्षातील सरासरी ८५ टक्के दिवस हवा शुद्ध असायची. १९९४-२००८ (बिघडलेली परिस्थिती) : विकासाच्या वेगासोबत प्रदूषणाने पाय पसरले. खराब हवेच्या दिवसांचे प्रमाण १५ टक्क्यांच्या पुढे गेले. दिल्ली आणि आग्रा या शहरांची हवा बिघडण्यास सुरुवात झाली.२००९-२०२४ (प्रदूषणाचा विळखा) : गेल्या १५ वर्षांत परिस्थिती भयावह झाली आहे. वर्षातील ३५ टक्के दिवस हवा ‘खराब’ किंवा ‘गंभीर’ श्रेणीत असते.  किनारपट्टीवरील शहरेही आता सुरक्षित उरलेली नाहीत.

सरकारी आकडेवारीपेक्षा १० टक्के जास्त धोका!अहवालात ‘एक्स्पोजर बायस’बाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या फोनवर दिसणारा (हवेचा गुणवत्ता निर्देशांक) पूर्ण सत्य सांगत नाही. सरकारी आकडेवारीच्या तुलनेत आपण प्रत्यक्षात १० टक्के जास्त प्रदूषित हवेत श्वास घेत आहोत. शास्त्रज्ञांनी सुचवले आहे की, आता शहरांमधील प्रदूषण मोजण्यासाठी ‘एक्स्पोजर वेटेड सिस्टीम’ वापरण्याची गरज आहे, जेणेकरून जनतेला त्यांच्या आरोग्याला असलेल्या धोक्याची अचूक माहिती मिळू शकेल.

English
हिंदी सारांश
Web Title : India's air quality worsens: Clean air days decline drastically.

Web Summary : Air pollution in India has worsened significantly since the 90s. Clean air days dropped from 311 to 236 annually. Exposure bias hides the true pollution levels, needing updated measurement systems.
टॅग्स :pollutionप्रदूषण