काँग्रेसचेकर्नाटकमधीलआमदार शिवगंगा बसवराज यांनी एका महिला अधिकाऱ्याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वाद उफाळला आहे. शिवगंगा बसवराज यांनी एका गर्भवती वनअधिकाऱ्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यावरून महिला अधिकार संघटनांसह विरोधी पक्षातील भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर काँग्रेसने या प्रकाराबाब मौन बाळगले आहे.
कर्नाटक विकास कार्यक्रमाच्या तिमाही समीक्षा बैठकीमध्ये ही घटना घडली. या बैठकीला फॉरेस्ट रेंजर्स अधिकाऱी असलेल्या श्वेता ह्या अनुपस्थित राहिल्याने आमदार बसवराज संतापले. नंतर बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, जर त्या गर्भवती असतील तर त्यांनी सुट्टी घेतली पाहिजे. काम करण्याची काय गरज? त्या केवळ पगार घेण्यासाठी येतात. मात्र बैठक असली की गर्भवती असल्याचा बहाणा करतात. त्यांना लाज वाटत नाही का, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, मातृत्व रजा आहे ना, शेवटच्या तारखेपर्यंत पागार आणि एक्स्ट्रा घ्यायचा आहे, मात्र कामासाठी बोलावलं तर बैठकीला येऊ शकत नाही. गर्भवती असण हा केवळ बहाणा आहे. दरवेळी हाच बहाणा बनवतात. त्यांना लाज वाटत नाही का? दरम्यान, मी गर्भवती आहे, डॉक्टरकडे जात आहे, असे या महिला अधिकाऱ्याने बैठकीपूर्वी सांगितले होते.
एवढंच नाही तर सदर महिला अधिकारी लाच घेण्यासाठी ऑफिसमध्ये येते, तिच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे असा आरोपही बसवराज यांनी केला. दरम्यान, बसवराज यांनी आरोपांची फैर झाडण्यास सुरुवात केल्यावर बैठकीला उपस्थित असलेले अन्य अधिकारी अस्वस्थ झालेले दिसले, मात्र त्यांच्यापैकी कुणी विरोध केला नाही. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, महिला अधिकार कार्यकर्त्यांनी या व्हिडीओवरून काँग्रेसच्या महिला धोरणावर टीका केली आहे.
Web Summary : Karnataka Congress MLA Shivganga Basavaraj criticized a pregnant forest officer for attending meetings while pregnant. He questioned her dedication and accused her of using pregnancy as an excuse. His remarks sparked outrage and calls for action.
Web Summary : कर्नाटक कांग्रेस विधायक शिवगंगा बसवराज ने एक गर्भवती वन अधिकारी की आलोचना की, जिससे विवाद हो गया। उन्होंने अधिकारी पर बैठक में अनुपस्थित रहने का आरोप लगाया और कहा कि वे केवल वेतन के लिए आती हैं। उनके बयान से आक्रोश फैल गया।