शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएफ’मधून ५० हजार काढल्यास टीडीएस नाही

By admin | Updated: May 31, 2016 06:32 IST

भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) ५० हजार रुपये काढल्यास त्यावर एक जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) ५० हजार रुपये काढल्यास त्यावर एक जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून काढण्यात येणाऱ्या रकमेवर कपातीची मर्यादा ३० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली असून सरकारने यासंबंधी अधिसूचनाही जारी केली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.प्राप्तीकर कायदा १९६१च्या कलम १९२-ए मध्ये वित्तीय अधिनियमान्वये दुरुस्ती करून ही मर्यादा वाढविण्यात आली आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. ही तरतूद १ जून २०१६ पासून लागू होणार आहे.कर्मचाऱ्यांनी मुदतीआधी पीएफमधून पैसे काढू नयेत आणि दीर्घ मुदतीच्या बचतीसाठी प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशातून सरकारने मुळातून प्राप्तीकर कपात (टीडीएस) करण्याचा नियम लागू केला होता. सध्याच्या तरतुदीनुसार पॅन नंबर दिलेला असेल तर, टीडीएस कपातीचा दर १० टक्के आहे. तथापि, १५ जी किंवा १५ एच फॉर्म संबंधित पीएफ सदस्य कर्मचाऱ्याने सादर केला असेल तर, टीडीएस कापला जात नाही. पीएफमधून रक्कम काढल्यास निवृत्तीनंतरचे एकूण उत्पन्न करपात्र नसेल, अशी घोषणा करण्यासाठी हे फॉर्म आहेत. साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ एच, तर त्यापेक्षा कमी वय असलेल्यांसाठी १५ जी हा फार्म आहे. पॅन किंवा हे दोन्ही फॉर्म सादर केलेला नसेल तर टीडीएस कपातीचा दर ३४.६०८ टक्के आहे.टीडीएस कपातीसंदर्भात काही अपवाद आहेत. एका खात्यातून पीएफ दुसऱ्या पीएफ खात्यात वळती केल्यास टीडीएस कापला जात नाही. तसेच कर्मचाऱ्याने पाच वर्षांनी पीएफ काढल्यास टीडीएस कापला जात नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)