रात्री २ वाजता अडचण आली तर मोदींना फोन करणार की शाह यांना? मुख्यमंत्री धामी यांनी संपष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:13 IST2026-02-25T18:12:03+5:302026-02-25T18:13:57+5:30

"प्रत्येक राज्याची आव्हाने वेगळी असतात. प्रत्येकाचे मॉडेल त्यांच्या राज्यानुसार ठरते. सध्या, देश आणि राज्यासाठी सर्वोत्तम असलेले एकमेव मॉडेल म्हणजे "सबका साथ, सबका विकास." याच  बरोबर, विरोधी पक्षातील नेत्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीपेक्षा विचारधारा आणि संघटना महत्त्वाची असते.

If there is a problem at 2 am, will you call Modi or Shah Chief Minister Dhami made it clear | रात्री २ वाजता अडचण आली तर मोदींना फोन करणार की शाह यांना? मुख्यमंत्री धामी यांनी संपष्टच सांगितलं

रात्री २ वाजता अडचण आली तर मोदींना फोन करणार की शाह यांना? मुख्यमंत्री धामी यांनी संपष्टच सांगितलं

रात्री २ वाजता काही अडचण आली, तर कुणाला फोन लावणार मोदी की शाह?  यासंदर्भात बोलताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. "आमच्या पक्षाची कार्यसंस्कृती अतिशय स्पष्ट आणि उत्कृष्ट आहे. मला उत्तर निवडण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिले. याच वेळी त्यांनी, आपण उत्तराखंडच्या विकासासाठी, आपण कठोर निर्णय घेण्यापासून मागे हटनार नाही, हेही स्पष्ट केले. ते देहरादून येथे लाइव्ह हिंदूस्तानशी बोलत होते. 

नेमकं काय म्हणाले पुष्कर सिंह धामी? - 
यावेळी, जर आपल्याला रात्री २ वाजता काही मोठी अडचण आली, तर कुणाला फोन लावणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना की गृहमंत्री अमित शाह यांना? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर स्मितहास्य करत धामी म्हणाले, "आमच्या पक्षाची कार्यसंस्कृती अत्यंत स्पष्ट आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यात मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. परिस्थितीनुसार मी निर्णय घेईन. मी दोन्ही नेत्यांना कॉल करू शकतो आणि अनेकदा त्यांचे मार्गदर्शनही घेतले आहे."

मोदींचे 'सबका साथ सबका विकास' की योगींचे बुलडोझर मॉडेल -
पंतप्रधान मोदींचे 'सबका साथ-सबका विकास' मॉडेल की योगींचे 'बुलडोझर मॉडेल' यापैकी एकाची निवड करायची असल्यास? यावर धामी म्हणाले, "प्रत्येक राज्याची आव्हाने वेगळी असतात. प्रत्येकाचे मॉडेल त्यांच्या राज्यानुसार ठरते. सध्या, देश आणि राज्यासाठी सर्वोत्तम असलेले एकमेव मॉडेल म्हणजे "सबका साथ, सबका विकास." याच  बरोबर, विरोधी पक्षातील नेत्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीपेक्षा विचारधारा आणि संघटना महत्त्वाची असते.

दरम्यान, जर विरोधी पक्षातील एक नेता भाजपमध्ये आणायचा असेल आणि एखादा भाजपतून विरोधी पक्षात पाठवायचा असेल तर? धामी म्हणाले, "व्यक्ती कायम टिकत नाही, पण संघटना कायम टिकते. आमच्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या कोणालाही आम्ही समाविष्ट करू."

Web Title : धामी ने स्पष्ट किया: मोदी या शाह, किसे करेंगे फोन?

Web Summary : उत्तराखंड के मुख्यमंत्री धामी ने कहा कि वे आपातकाल में स्थिति के अनुसार मोदी या शाह को फोन कर सकते हैं। उन्होंने अपनी पार्टी की मजबूत कार्यशैली पर जोर दिया और 'सबका साथ, सबका विकास' को प्राथमिकता दी। धामी ने पार्टी सदस्यता में विचारधारा को व्यक्ति से ऊपर बताया।

Web Title : Dhami clarifies whom he'd call: Modi or Shah?

Web Summary : Uttarakhand CM Dhami stated he could call either Modi or Shah in an emergency, depending on the situation. He emphasized his party's strong work ethic and prioritizes 'Sabka Saath, Sabka Vikas'. Dhami also noted the importance of ideology over individuals when considering party membership.