शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

...तर मी स्वत: जम्मू काश्मीरचा दौरा करेन, सरन्यायाधीशांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 1:32 PM

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

नवी दिल्ली -  काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, गरज पडली तर मी स्वत: जम्मू-काश्मीरचा दौरा करेन. जम्मू-काश्मीर हायकोर्टात जाईन, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. 

काश्मीरमधील परिस्थितीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश गोगोई म्हणाले की, ''याबाबत मी जम्मू काश्मीर हायकोर्टाकडून एक अहवाल मागवला आहे. हा अहवाल पाहिल्यानंतर जर मला वाटले की मला तिथे गेले पाहिजे, तर मी स्वत: जम्मू-काश्मीर हायकोर्टात जाईन.'' दरम्यान, काश्मीरमधील परिस्थिती निवळण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत. त्याची माहिती द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले. त्यावर काश्मीरमध्ये आतापर्यंत एकही गोळी चालवण्यात आलेली नाही. मात्र स्थानिक पातळीवर काही निर्बंध लादलेले आहेत, असे केंद्र सरकाकरने सांगितले. दरम्यान, काश्मीरमधील परिस्थिती निवळण्यासाठी पावले उचला, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. तसेच काश्मीरमध्ये जर तथाकथित बंद लागू असेल तर त्यावर जम्मू काश्मीर उच्च न्यायालय तोडगा काढू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काश्मीरला जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार गुलाम नबी आझाद यांना चार जिल्ह्यांना भेट देता येणार आहे. मात्र आझाद यांना कुठलेही भाषण अथवा सभेला संबोधित करता येणार नाही. 

 कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या विविध याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून माहिती मागवली आहे. काश्मीरमधील परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्या  केंद्र सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयासोबतच नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेविरोधातही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तामिळनाडूमधील नेते वायको यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ३० सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRanjan Gogoiरंजन गोगोई