शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

ज्येष्ठांचा अनादर करणारे जनतेचा काय सन्मान करणार?; अडवाणींचं तिकीट कापल्यानंतर काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 8:48 AM

आधी मार्गदर्शक मंडळात रवानगी, आता मतदारसंघ हिसकावला; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

नवी दिल्ली: सत्ताधारी भाजपानं काल लोकसभा निवडणुकीसाठी 184 उमेदवारांची यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीमधून, तर भाजपा अध्यक्ष अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित शहा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यासाठी भाजपानं ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचं तिकीट कापलं. यावरुन काँग्रेसनं मोदी-शहांवर निशाणा साधला. जे ज्येष्ठांचा आदर करत नाहीत, ते जनतेच्या विश्वासाचा काय सन्मान करणार?, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. 'आधी अडवाणींची जबरदस्तीनं मार्गदर्शक मंडळात रवानगी करण्यात आली आणि आता त्यांचा मतदारसंघदेखील हिसकावून घेण्यात आला. मोदी ज्येष्ठांचा आदर करत नाहीत. मग ते जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार? भाजपा भगाओ, देश बचाओ,' असं ट्विट काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं. काल (गुरुवारी) संध्याकाळी भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवणार असल्याचं भाजपाकडून जाहीर करण्यात आलं. अमित शहा पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचे दिग्गज नेते अडवाणी 1998 पासून या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. अमित शहा गुजरातमधून निवडणूक लढवत असताना पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून लोकसभेच्या रिंगणात उतरतील. भाजपाच्या पहिल्या यादीत 20 राज्यांमधील 184 उमेदवारांची नावं आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून, तर नितीन गडकरी नागपूर, व्ही. के. सिंह गाजियाबाद, सत्यपाल सिंह बागपतमधून निवडणूक लढवतील. या नेत्यांचे मतदारसंघ भाजपानं कायम ठेवले आहेत. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा अमेठीत पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आव्हान देणार आहेत. इराणी गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी