शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "माझं वय ७० पेक्षा अधिक, १०-१५ वर्षच शिल्लक; प्रथम तरूणांना लस द्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 4:24 PM

आजपासून देशभरात झाली लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

ठळक मुद्देआजपासून देशभरात झाली लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवातदेशभरात अनेक नेत्यांनी टोचून घेतली लस

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून म्हणजेच १ मार्चपासून सुरूवात झाली. यादरम्यान, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. दरम्यान, राज्यसभेतील विरोधीपक्षातील नेते मल्लिकार्जुन खरगे यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी तरूणांना प्राधान्य दिलं जावं असं म्हटलं. "माझं वय हे ७० वर्षांपेक्षा अधिक आहे. तुम्ही ही लस सर्वप्रथम तरूणांना दिली पाहिजे. माझी आयुष्याची १०-१५ वर्ष शिल्लक असतील. परंतु ज्यांच्याकडे पुढची अनेक वर्ष आहेत अशा तरूणांना ही लस देण्यात यावी," अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.  आजपासून म्हणजेच १ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं आहे. 

काय म्हणाले मोदी?"एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीनं काम केलं, ते कौतुकास्पद आहे." तसंच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. कोणाला लस मिळणार, किती रुपये द्यावे लागणार?कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा राबविला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या टप्प्यात २७ कोटी नागरिकांचं लसीकरण केलं जाईल. जवळापास १२ हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी २५० रुपये द्यावे लागतील. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत