शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद मुक्ती दिन साजरा करणार नाही

By admin | Updated: September 8, 2016 05:10 IST

भाजपने १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याची केलेली सूचना सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने फेटाळून लावताना भाजप ‘फूट पाडणारे राजकारण’ करीत असल्याचा आरोप केला.

हैदराबाद : भाजपने १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याची केलेली सूचना सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने फेटाळून लावताना भाजप ‘फूट पाडणारे राजकारण’ करीत असल्याचा आरोप केला. नेमस्त स्वभावाच्या तेलंगणातील लोकांचा या मुक्तिदिनावर विश्वास नाही. भारतात ज्या दिवशी तेलंगण विलीन झाले तो दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे टीआरएसच्या खासदार कल्वकुंतला कविता म्हणाल्या. त्या तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत.केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, १५ आॅगस्ट १९४७ रोजी देश अत्यंत परिश्रमांनी मिळविलेल्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत असताना तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला त्या स्वातंत्र्यासाठी १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत वाट बघावी लागली.’’ त्यादिवशी (१७ सप्टेंबर) जुलमी निझामाच्या राजवटीतून हैदराबाद संस्थान मुक्त होऊन भारतात विलीन झाले. १७ सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून साजरा व्हावा अशी मागणी भाजप गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे परंतु काही राजकीय पक्ष देशाच्या एकात्मतेशी संबंधित प्रश्नांकडेही मतपेटीच्या नजरेतून बघतात, असेही नायडू म्हणाले होते.निजामाच्या जुलमी राजवटीमध्ये तेलगू भाषेला शैक्षणिक संस्थांमध्ये माध्यम म्हणून वापरण्यास नाउमेद करण्यात आले होते, असे नायडू यांनी सांगितले. त्यावर निजामबाद मतदारसंघातून निवडून आलेल्या खा. कविता म्हणाल्या की, ‘‘तेलंगणला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी होत असताना हा दिवस (१७ सप्टेंबर) टीआरएसने विलिनीकरण दिवस म्हणूनच साजरा केला व पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वजही फडकावला. कारण आंध्र प्रदेश सरकार या दिवसाला मान्यता देत नाही.’’ (वृत्तसंस्था)