शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

थलपती विजय कसे गाठणार बहुमताचा 'मॅजिक फिगर'? नवा पेच : काँग्रेस येणार का सोबत? अल्पमताचे सरकार स्थापन होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 08:05 IST

विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. (विजय यांनी पेरांबूर आणि तिरुची पूर्व अशा दोन जागांवरून विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांना एक जागा सोडावी लागेल.

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात 'त्रिशंकू' स्थिती निर्माण झाली आहे. हा 'त्रिशंकू' चक्रव्यूह भेदून विजय यांना सत्ता स्थापन करावी लागणार असून, त्यासाठी त्यांनी काँग्रसकडे पाठिंबा मागितला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...

विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. (विजय यांनी पेरांबूर आणि तिरुची पूर्व अशा दोन जागांवरून विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांना एक जागा सोडावी लागेल. परिणामी टीव्हीकेचे संख्याबळ १०७ होईल. तामिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी सरकार स्थापनेसाठी ११८ जागांचे बहुमत आवश्यक आहे. सरकार स्थापनेसाठी विजय यांना अजून ११ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, विजय यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडे पाठिंब्यासाठी संपर्क साधला आहे. राजकीय वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर १० मे २०२६ च्या सुमारास नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

अध्यक्षांची निवड महत्त्वाची

बहुमत सिद्ध करताना विधानसभेच्या अध्यक्षांची निवड महत्त्वाची ठरेल. अध्यक्षांना मतदानाचा अधिकार नसल्याने, तांत्रिकदृष्ट्या टीव्हीकेला स्वतःचे स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी किमान १२ अतिरिक्त आमदारांच्या समर्थनाची गरज भासेल.

काय सांगतात आकडे?

पक्ष           जिंकलेल्या जागा

टीव्हीके         १०८

द्रमुक          ५९

अण्णाद्रमुक             ४७

काँग्रेस         ५

पीएमके        ४

मुस्लिम लीग           २

सीपीआय              २

व्हिसीके        २

सीपीआयएम            २

भाजप         १

डीएमडीके              १

अम्मा मक्कल          १

एकूण          २३४

काय आहेत शक्यता?

टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी द्रमुक आघाडीतील लहान पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडू शकते. यामध्ये काँग्रेस (५ जागा), व्हीसीके (२), सीपीआय (२) आणि सीपीआयएम (२) या पक्षांचा समावेश आहे. या सर्वांनी पाठिंबा दिल्यास टीव्हीकेचा आकडा नेमका ११८ वर पोहोचू शकतो.

जर एखादा पक्ष थेट सत्तेत सामील होण्यास तयार नसेल, तर टीव्हीके त्यांना मंत्रिमंडळात न घेता केवळ विश्वासदर्शक ठरावावेळी 'बाहेरून पाठिंबा' देण्याची विनंती करू शकते.

काँग्रेसची भूमिका काय?

विजय यांनी आधी काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधला आहे. काँग्रेसने अद्याप अधिकृत निर्णय घेतलेला नाही, परंतु 'भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी' ते धर्मनिरपेक्ष सरकारला पाठिंबा देण्याचे संकेत देत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Thalapathy Vijay's Path to Majority: Congress Support Key in Tamil Nadu?

Web Summary : Actor Vijay's party, TVK, won the most seats in Tamil Nadu, but lacks a majority. He needs 11 more seats to form the government and has requested support from Congress. The speaker's election will be crucial. Congress support could be decisive in forming a government and keeping BJP out.
टॅग्स :PoliticsराजकारणKeralaकेरळ