शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्टमध्ये किती SC,ST,OBC? सीतारमन यांचं वर्मावर बोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 21:07 IST

अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची जात विचारणाऱ्या राहुल गांधींवर निर्मला सीतारामन यांचा पलटवार.

Parliament Session : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता मंगळवारी(दि.30) सीतारामन यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, "अर्थसंकल्प तयार करणारे आणि हलवा समारंभात सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांची जात विचारणे, हे समाजाला अनेक वर्गात विभागण्याचे षडयंत्र आहे. राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये एससी-एसटी समाजातील किती  लोकांना स्थान मिळाले?" अशी विचारणा अर्थमंत्र्यांनी केली.

2013-14 मध्ये अधिकाऱ्यांची जात का विचारली नाही?सीतारामन पुढे म्हणतात, "हा फोटो इव्हेंट कधीपासून बनला? 2013-14 मध्येही अर्थसंकल्पापूर्वी हलवा समरांभ झाला होता. तेव्हा कोणी अधिकाऱ्यांची जात विचारली होती का? आता अर्थसंकल्प तयार करणाऱ्यांची जात विचारून लोकांमध्ये फूट का टाकताय? मिंटो रोडवर जेव्हा बजेट पेपर छापले जायचे, तेव्हापासून हा सोहळा सुरू आहे. बजेटची तयारी सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांकडूनच हलवा तयार केला जातो, ही भारतीय परंपरा आहे," असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

अर्थमंत्री इथेच थांबल्या नाहीत, तर त्यांनी राहुल आणि काँग्रेसलाच उलट प्रश्न केला. त्या म्हणाल्या की, "पूर्वीची काँग्रेस सरकारे आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्यासारखे पंतप्रधानदेखील आरक्षणाचे मोठे टीकाकार होते. आता राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये एससी-एसटी आणि ओबीसी समाजातील किती लोकांना स्थान देण्यात आले आहे? हे काँग्रेसने सांगावे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी काय म्हटले होते?सोमवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत देशाचा अर्थसंकल्प बनवण्याचे काम 20 अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र सहभागी अधिकाऱ्यांमध्ये केवळ एक अल्पसंख्याक आणि एक ओबीसी आहे. त्यांच्यामध्ये एकही दलित किंवा आदिवासी नाही, असा दावा केला. तसेच, राहुल यांनी अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या हलवा समारंभाचा हवाला देत या सरकारमध्ये फक्त 2-3 टक्के लोकच हलवा बनवतात आणि तेवढेच लोक खात असल्याचा आरोप केला होता. लोकसभेत हलवा समारंभाचा फोटो दाखवत राहुल गांधी म्हणाले, या फोटोमध्ये मला कोणताही ओबीसी किंवा आदिवासी किंवा दलित अधिकारी दिसत नाही, असाही आरोप केला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस