देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयाचे घर फोडले

By Admin | Updated: June 18, 2015 13:44 IST2015-06-18T13:39:10+5:302015-06-18T13:44:06+5:30

सोलापूर : वैष्णव देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुुटुंबीयाचे घर फोडून ७० हजार रुपयांचे दागिने पळवल्याची घटना १४ ते १६ जून दरम्यान म्हेत्रे वस्तीतील मुक्ता बंगलोजच्या पाठीमागे राहत असलेल्या सीताराम चमनसिंग बाबावाले यांच्या घरी घडली.

The house of the family who went to the show | देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयाचे घर फोडले

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयाचे घर फोडले

सोलापूर : वैष्णव देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुुटुंबीयाचे घर फोडून ७० हजार रुपयांचे दागिने पळवल्याची घटना १४ ते १६ जून दरम्यान म्हेत्रे वस्तीतील मुक्ता बंगलोजच्या पाठीमागे राहत असलेल्या सीताराम चमनसिंग बाबावाले यांच्या घरी घडली.
बाबावाले कुटुंबातील सर्वच सदस्य वैष्णव देवीच्या दर्शनासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या हुच्चेश्वर नगरातील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. आतील दागिने हातोहात पळवले. सीताराम बाबावाले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार सोनाने करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The house of the family who went to the show