शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

JNU Attack : नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींबद्दल काय म्हणाली होती दीपिका?; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 12:54 PM

JNU Protest : जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताच दीपिकाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी तिनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यानंतर भाजपाचे नेते आणि समर्थकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दीपिकाची जेएनयू परिसरातील उपस्थिती राजकीय स्वरुपाची असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं. तर काहींनी हा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं म्हटलं. आपण निर्भीडपणे आपलं मत मांडत आहोत, हे पाहून मला अभिमान वाटतो, असं दीपिकानं जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं. लोक समोर येऊन आणि कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवत आहेत. हा निर्भीडपणा कौतुकास्पद आहे, असंदेखील दीपिका म्हणाली. यावेळी दीपिकानं कोणतंही राजकीय विधान केलं नाही. मात्र दीपिकाच्या जेएनयूमधील उपस्थितीनंतर तिची 2010 मधील एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्या मुलाखतीत दीपिकानं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचं कौतुक केलं होतं.  'मला राजकारणाबद्दल फारशी माहिती नाही. मी टीव्हीवर राजकारणाबद्दलच्या थोड्या फार घडामोडी पाहते. राहुल गांधी आपल्या देशासाठी जे करत आहेत, ते एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. ते आपल्या देशासाठी खूप काही करत आहेत. एक दिवस ते पंतप्रधान होतील, अशी आशा आहे,' असं दीपिकानं ९ वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला वाटतं. ते तरुणांशी उत्तमपणे संवाद साधतात. त्यांचे विचार पारंपारिक आहेत. याशिवाय त्यांचा दृष्टीकोन भविष्यवेधी आहे. देशासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे,' अशा शब्दांत दीपिकानं राहुल यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. 

टॅग्स :jnu attackजेएनयूDeepika Padukoneदीपिका पादुकोणRahul Gandhiराहुल गांधी