शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:49 IST

Bhupender Singh Hooda : एकीकडे भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे भूपेंद्र हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा यांच्या नावाचीही चर्चा आहे.

Haryana Assembly Elections 2024 : हरियाणातील विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल, तसं राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ नेते मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. यातच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा (Bhupender Singh Hooda) यांनी पुनरुच्चार केला की, मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडने घ्यायचा आहे आणि तो मला मान्य असेल. परंतु त्यांनी असेही म्हटले की, मी निवृत्त झालो नाही किंवा थकलेलो नाही. 

काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढत आहे. तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा असून कुमारी सैलजा काही काळ निवडणूक प्रचारापासून दूर राहिल्या आहेत. भूपेंद्र हुड्डा यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भूपेंद्र हुड्डा म्हणाले की, हरियाणात काँग्रेस एकसंध आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एकापेक्षा जास्त दावेदार आल्याने पक्षाला अधिक बळ मिळणार आहे. राज्यात काँग्रेसला मोठा जनादेश मिळेल. 'अबकी बार कांग्रेस की सरकार' हे जनतेने ठरवले आहे.

एकीकडे भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे भूपेंद्र हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे दीपेंद्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे का? असा सवाल भूपेंद्र हुड्डा यांना करण्यात आला. त्यावेळी म्हणाले की, ना मी निवृत्त झालो आहे ना थकलो आहे. तसेच, हुड्डा यांनीही मतं कापण्याची शक्यता नाकारली. काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत असल्यामुळे जनता मतं कापणाऱ्यांकडे जाणार नाही, असे ते म्हणाले.

भूपेंद्र हुड्डा आज (२७ सप्टेंबर) कर्नालमधील उंद्री येथून रॅली काढत आहेत. भूपेंद्र हुड्डा हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील गढ़ी सांपला किलोई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पूर्वी जागेला किलोई म्हणून ओळखले जात होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सीमांकन झाल्यानंतर  या जागेला गढी सांपला किलोई असे संबोधले जाऊ लागले. भूपेंद्र हुड्डा यांनी २००० मध्ये पहिल्यांदा या जागेवर निवडणूक जिंकली होती. या जागेवरून सातत्याने निवडून येत आहेत.

टॅग्स :Haryanaहरयाणाcongressकाँग्रेस