शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो २...देवलापूरकरांकडून समाजाला शहाणपण देण्याचे काम : पानसरे दीपक देवलापूरकर यांचा गौरव

By admin | Updated: May 9, 2014 22:48 IST

कोल्हापूर : आज समाजात चांगले काहीच घडत नाही, असा प्रचार सुरू आहे. चुकीच्या घटना समाजात पटकन पसरतात पण चांगल्या कार्याच्या अत्तराचा फाया नाकाजवळ धरावा लागतो, त्याचवेळी समाजाला बिघडवणार्‍या व्यवस्थेची टक्कर द्यावी लागते. दीपक देवलापूरकर यांनी अशाचप्रकारे समाजाला शहाणपण देण्याचे काम केले आहे, असे मत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर : आज समाजात चांगले काहीच घडत नाही, असा प्रचार सुरू आहे. चुकीच्या घटना समाजात पटकन पसरतात पण चांगल्या कार्याच्या अत्तराचा फाया नाकाजवळ धरावा लागतो, त्याचवेळी समाजाला बिघडवणार्‍या व्यवस्थेची टक्कर द्यावी लागते. दीपक देवलापूरकर यांनी अशाचप्रकारे समाजाला शहाणपण देण्याचे काम केले आहे, असे मत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी व्यक्त केले.
शाहू स्मारक भवनच्या मिनी हॉलमध्ये सेवानिवृत्तीनिमित्त दीपक देवलापूरकर गौरव समितीच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कुष्ठरोग विभागाच्या साहायक संचालिका हर्षला वेदक, निवृत्त कर्नल प्रकाश मिठारी उपस्थित होते.
पानसरे म्हणाले, सरकारी अधिकार्‍यांबद्दल चांगले बोलण्याचे प्रसंग फार कमी येतात. पण चांगल्या अधिकार्‍यांबद्दल समाज मनात टोकाचे प्रेम असते. अधिकारी हे लोकशाहीचा आधारस्तंभ असतात तर लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकार्‍यांना सरळ करण्याचे काम कार्यकर्त्यांचे असते. देवलापूरकर यांनी एक अधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून समाजाला शहाणपण देण्याचे काम केले आहे.
सत्कारानंतर देवलापूरकर म्हणाले, आम्ही शून्यातून समाजकार्याचे पर्यावरण रक्षणाचे हे काम निर्माण केले. सरकारी अधिकारी असतानाही कधी रुपयाची लाच घेतली नाही, कुणाला दिली नाही. व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकवेळी शासनालाच दोष देऊन चालणार नाही तर आपणही आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यासाठी दबावगट निर्माण केला पाहिजे. अलका देवलापूरकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
हर्षला वेदक म्हणाल्या, कुष्ठरोग्यांचा सन्मान आणि जगण्याचे बळ देण्याचे काम देवलापूरकर यांनी केले आहे. त्यांच्या या कार्यात आपण काही खारीचा वाटा उचलू शकतो का याचा विचार सर्वांनी केला पाहिजे.
सुरेश शिपूरकर म्हणाले, देवलापूरकर आणि माझी पहिली भेट १९८२ मध्ये झाली. त्यावेळी कुष्ठरोग्यांना डॉक्टरांकडून मिळणार्‍या वाईट वागणुकीबद्दल मला सांगितले आणि आम्ही तेथे पहिले आंदोलन डॉक्टरांविरोधात केले. वंचित घटक, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण रक्षणासाठी झटणारा हा कार्यकर्ता आहे. यावेळी प्रकाश मिठारी, साधना पाटील, अंकुश वणकुद्रे, बापूसाहेब हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. आर. आर. कांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रकाश सुतार यांनी सूत्रसंचलन केले. व्ही. बी. चौगले यांनी आभार मानले.
----------
फोटो नं ०९ कोल देवलापूरकर
ओळ :
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते दीपक देवलापूरकर यांचा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षला वेदक, अलका देवलापूरकर, सुरेश शिपूरकर, प्रकाश मिठारी उपस्थित होते. (नसीर अत्तार)
---------------------