शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2902वर, 30 टक्के लोक तबलिगी जमातचे - आरोग्य मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 18:12 IST

एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातशी संबंधित असून 17 राज्यांतील 1023 तबलिगी जमातशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत देशभरात 2902 जणांना कोरोनाची लागण 183 जण बरे होऊन घरी परतले 42 टक्के लोक 21-40 वर्ष वयोगटातील

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशभरात 2902 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 68 जणांचा मृत्यू झाला, तर 183 जण बरे होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे, एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातशी संबंधित असून 17 राज्यांतील 1023 तबलिगी जमातशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती, आरोग्यमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

42 टक्के लोक 21-40 वर्ष वयोगटातील -अग्रवाल म्हणाले, कोरोनाची लागण झालेल्यांपैकी 9 टक्के रुग्ण 0-20 वयोगटातील आहेत, 42 टक्के लोक 21-40 वर्ष वयोगटातील आहेत. 33 टक्के लोक 41-60 वर्ष वयोगटातील आहेत. तर 17 टक्के लोक 60 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. आतापर्यंत देशात 2,902 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारपासून ते आतापर्यंत एकूण 601 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत आणि 12 जणांचा मृत्यूही झाला आहे.

कोरोना झालेल्यांपैकी 58 जण अत्यवस्थ -कोरोनाची लागण झालेल्यांपैकी तब्बल 58 रुग्ण सध्या अत्यवस्थ आहेत. हे सर्वजण केरळ, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील आहेत. ज्या 17 राज्यांत तबलीगी जमातशी संबंधित कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तेथे प्रामुख्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया सुरू आहे. घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, कोरोनाविरोधातील लढाईसाठी जागरूक होण्याची आवश्यता आहे. आम्ही कोरोना टेस्टिंगची क्षमता सातत्याने वाढवत आहोत, असे अग्रवाल म्हणाले. 

तबलिगी जमातशी संबंधित 22 हजार जण क्वॉरंटाईनमध्ये -गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले, की तबलिगी जमातचे सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 22 हजार जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकारdelhiदिल्लीMuslimमुस्लीमKeralaकेरळMadhya Pradeshमध्य प्रदेश