Hathras Gangrape: बलात्कार झाला नसल्याचे चित्र रंगविण्याचा भाजपचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:03 AM2020-10-05T01:03:49+5:302020-10-05T01:04:23+5:30

Hathras Gangrape पक्षाच्या आयटी प्रमुखानेही झळकविला वादग्रस्त व्हिडिओ

Hathras Gangrape BJP IT cell chief Amit Malviya tweets video of victim | Hathras Gangrape: बलात्कार झाला नसल्याचे चित्र रंगविण्याचा भाजपचा प्रयत्न

Hathras Gangrape: बलात्कार झाला नसल्याचे चित्र रंगविण्याचा भाजपचा प्रयत्न

googlenewsNext

लखनऊ : हाथरस येथे दलित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे चित्र रंगविण्याचा आता भाजप नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. या मुलीची ओळख पटविणारा व्हिडीओ टिष्ट्वट केल्याबद्दल भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तर बलात्काराच्या घटना या कडक शिक्षा देऊन नव्हे तर संस्कार करूनच कमी होऊ शकतात, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे.

बलात्कार पीडित दलित मुलीचे ओळख पटेल अशा पद्धतीचा एक व्हिडीओ अमित मालवीय यांनी शुक्रवारी टिष्ट्वट केला होता. त्यासोबत त्यांनी असा दावा केला होता की, या मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला असा दावा तिने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाबाहेर एका पत्रकाराला सांगितले होते. तिच्यावर बलात्कार झाल्याचे कोणत्याही वैद्यकीय तपासणीतून सिद्ध झालेले नाही. या व्हिडीओतून बलात्कार पीडित मुलीची ओळख स्पष्ट होत असेल तर ती दुदैर्वी घटना आहे. आम्ही या प्रकाराची चौकशी करू असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितले.

आरोपीबद्दलची वस्तुस्थिती निराळी
हाथरस प्रकरणात पकडलेल्या आरोपी बलात्कारी असल्याचे चित्र रंगविले जात आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे असे भाजपचे माजी आमदार राजवीर पहेलवान यांनी म्हटले आहे.

दलित मुलीवर बळजबरी केल्याच्या खुणा
हाथरस येथील दलित मुलीच्या शरीरावर बळजबरी तसेच अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या खुणा आहेत असे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाने तयार केलेल्या वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.

Web Title: Hathras Gangrape BJP IT cell chief Amit Malviya tweets video of victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.