शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Hathras Case: हाथरसमध्ये आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 5:58 AM

Hathras Case: प्रचंड तणाव; परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप, नेत्यांनी कुटुंबीयांची घेतली भेट

हाथरस : उत्तर प्रदेशातील बलात्कारपीडित दलित तरुणीच्या हाथरस जिल्ह्यातल्या गावात अद्याप प्रचंड तणाव आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पीडित कुटुंबीयांना भेटू इच्छिणाऱ्या समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोक दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी रविवारी लाठीमार केला. रालोदचे नेते जयंत चौधरी यांनाही पोलिसांनी लाठ्या मारल्या.मात्र, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, समाजवादी पक्ष, रालोदच्या नेत्यांनी दलित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. गावात जमावबंदी असताना चार आरोपींच्या समर्थनार्थ त्यांच्या जातीच्या लोकांनी पीडितेच्या घरासमोरच सभा घेतली. पोलिसांनी त्यांना मात्र अटकाव केला नाही. त्यातच भाजपचे काही नेते आता आरोपींच्या बाजूने बोलू लागले आहेत. त्यात भाजपचे एक आमदार, माजी आमदार व स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळाला उत्तर प्रदेश पोलिसांनी काही काळ अडविले होते. तसेच शिष्टमंडळासह जाऊ पाहाणाऱ्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. बलात्कार घटनेच्या चौकशीसाठी समाजवादी पक्षाने एक समिती स्थापन केली आहे. राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी यांनी देखील दलित मुलीच्या कुटुंबीयांची त्यांच्या गावी जाऊन रविवारी भेट घेतली. जयंत चौधरी गावात एका ठिकाणी पत्रकारांशी बोलत असताना ते व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अचानक लाठीमार सुरू केला. त्यामुळे चौधरी व कार्यकर्ते सैरावैरा पळू लागले. पीडितेच्या कुटुंबीयांना वाय-प्लस सुरक्षा द्यादलित मुलीच्या कुटुंबीयांना वाय-प्लस सुरक्षा द्या, अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली. त्यांनी दलित मुलीच्या कुटुंबीयांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. चंद्रशेखर आझाद यांना गावापासून पाच किमी दूर अंतरावर पोलिसांनी रोखले. त्यानंतर, गावाच्या वेशीवर त्यांना पुन्हा रोखण्यात आले.पोलिसांनी मागितली प्रियंका गांधी यांची माफीलखनौ : प्रियंका गांधी शुक्रवारी हाथरस येथे जात असताना पोलिसांनी त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर, उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांची माफी मागितली. हायवेवर पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करीत होते. त्यावेळी हस्तक्षेप करणाºया प्रियंका यांचा कुर्ता पोलिसांनी खेचला होता.संपादक संघटनेतर्फेनिषेधहाथरस प्रकरणाच्या बातम्या मिळवण्यासाठी तिथे गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी जी वाईट वागणूक दिली, त्याचा एडिटर्स गिल्ड आॅफ इंडियाने निषेध केला आहे.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार