शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:17 IST

एका चालत्या गाडीला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच कार जळून खाक झाली.

उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर असलेल्या हथिनीकुंड बॅरेजजवळ शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. एका चालत्या गाडीला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच कार जळून खाक झाली. यमुना नदीवरील पुलावर घडलेल्या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कारमधील सर्वजण वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कारमधून हलका धूर निघताना दिसला. काही सेकंदात खूप धूर यायला लागला आणि अचानक कारच्या बोनेटमधून आगीच्या ज्वाळा निघाल्या. आग पसरताच आत असलेले लोक घाबरले, परंतु त्यांनी बाहेर उडी मारली आणि आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. आगीने संपूर्ण कारला वेढलं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला, ज्यामध्ये कार जळत असल्याचं आणि काही अंतरावर उभे असलेले लोक याचा व्हिडीओ आणि फोटो काढत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. भीषण आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळानंतर आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे आगीत जळून खाक झाली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात आगीचं कारण कारमधील तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किट असल्याचं दिसून आलं आहे, परंतु फॉरेन्सिक रिपोर्टनंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल. पोलीस कार मालकाकडून याबाबत माहिती घेत आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने लोकांना इशारा दिला की जर त्यांना त्यांच्या वाहनातून आवाज, धूर किंवा जळण्याचा वास येत असेल तर त्यांनी ताबडतोब कार थांबवावी आणि बाहेर पडावं.

English
हिंदी सारांश
Web Title : Terrifying Car Fire Near Haryana Border; Passengers Escape Unharmed

Web Summary : A car caught fire near the Haryana border, engulfing it in flames. Passengers escaped unharmed. Initial investigations suggest a technical fault. Authorities advise immediate vehicle evacuation upon noticing unusual signs. Investigation is underway.
टॅग्स :fireआगcarकार