शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 12:24 IST

Babita Phogat And Vinesh Phogat : विनेश फोगाटवर बबिता फोगाटने प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेत्या विनेश फोगाटवर बबिता फोगाटने प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान बबिताला विचारण्यात आलं की, विनेश फोगाट काँग्रेसमध्ये गेल्याने फोगाट कुटुंब विभागलं गेलं आहे का? यावर ती म्हणाली की, कुटुंब विभागलं गेलेलं नाही. प्रत्येकाची एक विचारधारा असते. कोणीही कधीही पक्षात सामील होऊ शकतो. हा तिचा (विनेश) स्वतःचा निर्णय आहे, कदाचित तिचा निर्णय आधीच ठरलेला असेल.

इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बबिता फोगाटने महावीर फोगाट यांच्याबद्दलही मोठं विधान केलं आहे. बबिताला विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे महावीर फोगाट यांच्या नाराजीबद्दल विचारलं असता, ती म्हणाली "ज्या मुलांना त्यांनी कुस्तीतील डावपेच शिकवले आहेत, त्यांनी कुस्ती पूर्णपणे सोडावी अशी कोणत्या गुरूची इच्छा असेल? आणि तेही राजकारणासाठी."

"विनेश फोगाट स्वत: एका मुलाखतीदरम्यान सांगत होती की, २०३२ पर्यंत खेळण्याचा तिचा प्लॅन होता, पण मग असं नेमकं काय झालं? यात कुठेतरी काँग्रेसचा डाव दिसतो. त्यांनी तिला मागे ढकललं आहे, खेळण्यापासून रोखलं आहे. २०३२ पर्यंत खेळण्याचा विचार असलेल्या व्यक्तीला तुम्ही (काँग्रेस) तिकीट देऊन निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे"

बबिताला विनेशला ज्याप्रकारे अपात्र ठरवण्यात आलं, हे षड्यंत्र आहे की काहीतरी कमतरता राहिली यावर देखील प्रश्न विचारला. त्यावर तिने हा कोणत्याही कटाचा भाग नसल्याचं सांगितलं. २०१२ मध्ये २०० ग्रॅममुळे वजनामुळे मी स्वत:च अपात्र झाले होते, याला कट म्हणायचं का? वजन कमी करणं ही खेळाडूची जबाबदारी असते असं म्हटलं आहे. 
 

टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटVinesh Phogatविनेश फोगटcongressकाँग्रेसPoliticsराजकारण