शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हार्वर्डवाल्यांना हार्डवर्कचा अर्थ समजला - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: March 1, 2017 15:55 IST

. एका बाजूला ते आहेत जे हार्वर्ड विद्यापीठाबद्दल बोलतात आणि एका बाजूला गरीबाचा मुलगा आपल्या मेहनतीने देशाची अर्थव्यवस्था बदलत आहे.

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 1 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तरप्रदेशातील जाहीर सभेला संबोधित करताना नोबेल पारितोषिक विजेते हार्वर्डमधील अर्थतज्ञ अर्मत्य सेन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. हार्वर्डपेक्षा हार्डवर्क जास्त महत्वाचे आहे. एका बाजूला ते आहेत जे हार्वर्ड विद्यापीठाबद्दल बोलतात आणि एका बाजूला गरीबाचा मुलगा आपल्या मेहनतीने देशाची अर्थव्यवस्था बदलत आहे. उत्तरप्रदेशातील महाराजगंज येथील सभेत मोदींनी हे विधान केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर अर्मत्य सेन यांनी जोरदार टीका केली होती. नोटाबंदीमुळे विकासाची गती मंदावलेली नाही. नोटाबंदीचा जीडीपीवर परिणाम झालेला नाही त्याचा संदर्भ घेऊन मोदींनी अर्मत्य सेन यांच्यावर निशाणा साधला. हार्वर्डचे लोक काय विचार करत होते आणि हार्डवर्कने काय घडवले ते हार्वर्डवाल्यांना समजेल असे मोदी म्हणाले. 
 
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या विकासाच्या दाव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. उत्तरप्रदेशमध्ये विकास दिसतोय असे अखिलेश म्हणतात. पण  उत्तरप्रदेशची स्थिती आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटासारखी झाल्याचे राज्य सरकारची वेबसाईट सांगते याकडे त्यांनी लक्ष वेधले. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी पहिल्या पाच टप्प्यातच भाजपाचा विजय झालाय. उरलेल्या दोन टप्प्यात मिळणा-या जागा बोनस आहेत असा विजयाचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.