शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

हर्षा

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

टीम इंडियाची ताकद कमी झाली

टीम इंडियाची ताकद कमी झाली
हर्षा भोगले
भारतीय संघ गतविजेता असला तरी या वेळी या संघाचा जेतेपदाच्या दावेदारांमध्ये समावेश नाही. जर विश्वकप स्पर्धेचे आयोजन भारतात झाले असते, तर गतचॅम्पियन संघाचा निश्चितच जेतेपदाच्या दावेदारामध्ये समावेश असता. पण, आता येथील परिस्थितीमुळे भारतीय संघाची ताकद हिसकावल्या गेली आहे. भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याची जगातील चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
भारतीय संघ ८ फलंदाज आणि ५ गोलंदाजांसह समतोल साधण्यासाठी प्रयत्नशील असतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि काहीअंशी श्रीलंका संघाचा समतोल अशाच पद्धतीने साधला गेल्याचे दिसून येत आहे. उर्वरित संघांना चमकदार कामगिरी करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. भारतीय संघही याच गटात मोडतो. भारतासाठी गोलंदाजी चिंतेची बाब आहे. उमेश यादव व मोहंमद शमी यांच्याकडे प्रतिभा आहे; पण या दोन्ही गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. युवा खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे. भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करताना या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविणे आवश्यक आहे; पण कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे त्यात ते अपयशी ठरले आहे. सामन्याचा निकाल सुरुवातीला विकेट घेण्यावर अवलंबून असतो. गोलंदाजांसाठी अखेरच्या षटकांत वर्चस्व गाजविण्यासाठी सुरुवातीला बळी घेणे आवश्यक आहे. भारतीय संघाला सुरुवातीला बळी घेण्यात यश मिळत नाही; त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये धावगतीवर अंकुश राखणे भारतीय गोलंदाजांना अडचणीचे भासत आहे.
०००