शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

80 टक्के प्रवासी क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना मंजुरी, हरदीप पुरींनी ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 18:32 IST

कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए)ने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे.

नवी दिल्ली - नागरी उड्डण मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशांची क्षमता वाढवून आता 80 टक्के करण्याचा निर्मय घेतला आहे. नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ''25 मेरोजी 30 हजार प्रवाशांसह देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात करण्यात आली. हे प्रमाण वाढून आता 2.52 लाखांवर पोहोचले आहे. आता सरकार देशांतर्गत उड्डाणांसाठी 80 टक्के प्रवासी क्षमतेची परवानगी देत आहे.''आंतरराष्ट्रीय उड्डाणे 31 डिसेंबरपर्यंत बंद -कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए)ने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. यासंदर्भात डीजीसीएने पत्रकही काढले होते. भारतात कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. अनलॉकनंतरही यावरील स्थगिती उठविली नव्हती. युरोपमध्ये दुसरी लाट आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपवादात्मक परिस्थितीत काही ठरावीक मार्गांवर निवडक उड्डाणांना परवानगी देण्यात येऊ शकते, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे.

कार्गासेवा, वंदे भारत मोहिमेला वगळले -या निर्बंधातून कार्गासेवा, वंदे भारत मोहीम आणि विशेष विमानांना वगळण्यात आले आहे. भारताने अमेरिका आणि इंग्लंडसह २० देशांसोबत ‘एअर बबल’ करार केला आहे. याअंतर्गत जुलै महिन्यापासून विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत, तर देशांतर्गत विमानसेवेला २५ मेपासून परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :airplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत