शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 07:56 IST

क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नव्या मंत्रिमंडळात ८ मंत्री पटेल समाजाचे आहेत.  

गांधीनगर : गुजरातमध्ये राज्य मंत्रिमंडळ फेरबदलात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी १९ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले असून, मागील कार्यकाळातील ६ मंत्र्यांना कायम ठेवले आहे. यामध्ये हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्री म्हणून बढती देण्यात आली आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नव्या मंत्रिमंडळात ८ मंत्री पटेल समाजाचे आहेत.  

या फेरबदलानंतर मंत्रिमंडळाचा एकूण आकार १७ वरून वाढून २६ सदस्यांचा झाला आहे. गुजरात विधानसभेतील १८२ सदस्यांच्या संख्येनुसार, जास्तीत जास्त २७ मंत्र्यांची नियुक्ती करता येते (१५%). ही पुनर्रचना २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या दोन वर्षे आधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काही महिने आधी करण्यात आली आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नव्या मंत्र्यांना आणि पदोन्नती झालेल्या मंत्र्यांना शपथ दिली.

हर्ष संघवी उपमुख्यमंत्रिपदी सुरतच्या माजुरा मतदारसंघाचे आमदार हर्ष संघवी हे यापूर्वी गृह राज्यमंत्री होते. आता उपमुख्यमंत्रीपदी त्यांना बढती देण्यात आली आहे. 

गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच राज्यात उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले आहे. याआधी नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री होते. मात्र २०२१ मध्ये हे पद रद्द करण्यात आले.

असे आहे नवे मंत्रिमंडळ९ कॅबिनेट मंत्री१३ राज्यमंत्री ३ स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री

सहा मंत्री कायम, दहा जणांना डच्चू : गुरुवारी १६ मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यापैकी ६ जण नव्या मंत्रिमंडळात कायम आहेत. कनुभाई पटेल, ऋषिकेश पटेल, कुंवरजी बवालिया, हर्ष संघवी, प्रफुल्ल पंशेरिया, पुरुषोत्तम सोलंकी यांचा यात समावेश आहे. संघवी आणि  पंशेरिया यांनी नव्याने शपथ घेतली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gujarat's new cabinet: 26 ministers, 19 new faces, 8 Patels.

Web Summary : Gujarat's cabinet reshuffle brings in 19 new ministers, retaining six from the previous term. Harsh Sanghavi is promoted to Deputy Chief Minister. The expanded cabinet includes three women and eight ministers from the Patel community, ahead of upcoming elections.
टॅग्स :GujaratगुजरातPoliticsराजकारण