Video: दारुड्यांना घडली चांगलीच अद्दल; पोलिसांनी अटक केले आणि त्याच ठिकाणी नाचायला लावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 07:00 PM2023-02-23T19:00:34+5:302023-02-23T19:36:36+5:30

ड्राय स्टेट गुजरातमध्ये लग्नात दारू पिऊन नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई.

Gujarat Rajkot news; police arrested seven drunker youth and made them to dance on the same street | Video: दारुड्यांना घडली चांगलीच अद्दल; पोलिसांनी अटक केले आणि त्याच ठिकाणी नाचायला लावले

Video: दारुड्यांना घडली चांगलीच अद्दल; पोलिसांनी अटक केले आणि त्याच ठिकाणी नाचायला लावले

googlenewsNext

राजकोट:गुजरातमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दारुबंदी आहे, हे सर्वांनाच माहित आहे. पण, अनेकवेळा लपून-छपून दारुची विक्री आणि सेवन केले जाते. याचाच फटका काही तरुणांना बसला आहे. राजकोटमध्ये लग्नाच्या मिरवणुकीत दारू पिऊन नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर पोलिसांनी या तरुणांना अटक केली. खरी गम्मत इथून सुरू होते...

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एका लग्नात आठ तरुण दारू पिऊन नाचत होते आणि इतरांनाही नाचवत होते. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पोलिसांच्या हाती लागला. गुजरातमध्ये दारुबंदी लागू असल्याने आणि दारू विकणे आणि पिणे दंडनीय गुन्ह्याच्या श्रेणीत येतो. अशा परिस्थितीत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या लोकांचा शोध सुरू केला.

यानंतर भक्तीनगर पोलिसांनी त्यांची ओळख पटवून हिरेन उर्फ ​​हॅरी परमार, प्रतीक उर्फ ​​कालिओ परमार, धवल मारू, जयेश उर्फ ​​गतिओ दवे, मयूर खिंट, धर्मेश उर्फ ​​आसुडो रजनी, अजय उर्फ ​​जबरो रमाणी आणि नितीन खांडेखा या आठ जणांवर गुजरात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. नोंदणीकृत खांदेखा वगळता उर्वरित सात जणांना सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

अटक केल्यानंतर या 7 जणांना पोलिसांनी त्याच ठिकाणी नेले आणि मिरवणुकीत ते जसे नाचत होते त्याच पद्धतीने त्यांना नाचण्यास सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांना दारुच्या बाटलीऐवजी पाण्याची बाटली दिली आणि व्हायरल व्हिडिओप्रमाणे डान्स करण्यास सांगितले. या लोकांचा पोलिसांसमोर नाचतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अटक केलेल्या सातही जणांचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Gujarat Rajkot news; police arrested seven drunker youth and made them to dance on the same street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.