शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:56 IST

Gujarat News: पोलिसांच्या उपस्थितीत हा धक्कादायक प्रकार घडला; पोलिसांवरही अंडी फेकण्यात आली.

Gujarat News: उद्या, म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे, देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायल मिळत आहे. लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी सर्व गणेशभक्त सज्ज आहेत. पण, गुजरातमधील बडोदा शहरात या पवित्र सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील पाणीगेट परिसरात काल (२५ ऑगस्ट) रात्री ३ वाजता निर्मल पार्क युथ क्लबने स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तीवर समाजकंटकांनी अंडी फेकल्याची घटना घडली आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, या धक्कादायक घटनेमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. विश्व हिंदू परिषदेचे वडोदरा महानगर सचिव विष्णू प्रजापती यांनी सांगितले की, पोलिसांच्या उपस्थितीत ही अंडी फेकल्याची घटना घडली आहे. विहिंपने याप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. शहर पोलिस ठाण्याचे पीआय राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, सध्या चौकशी सुरू असून, चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांवरही अंडी फेकलीगणपती मंडळातील सदस्य सत्यम यांनी सांगितले की, आम्ही गणपतीची मूर्ती घेऊन जात असताना तिसऱ्या मजल्यावरुन कुणीतरी अंडी फेकली. आम्ही ताबडतोब शहर पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचताच त्यांच्यावरही अंडी फेकण्यात आली. ही घटना रात्री किशनवाडी कृष्णा तलावातून पाणीगेटला जाताना शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मजार मार्केटमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी कठोर शिक्षा करावी विश्व हिंदू परिषदेचे वडोदरा महानगर सचिव विष्णू प्रजापती म्हणाले की, पोलिसांच्या उपस्थितीत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अंडी फेकण्यात आली आहेत. हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. या कटात जो कोणी सहभागी असेल, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. या समाजकंटकांना उदाहरण देण्यासाठी आरोपींना मोठी शिक्षा द्यावी, अन्यथा या गोष्टी अशाच सुरू राहतील, अशी मागणी विहिंपने केली आहे.

टॅग्स :GujaratगुजरातGanesh Chaturthiगणेश चतुर्थीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस