जन-धन खात्यांची गिनीज बुकात नोंद

By Admin | Updated: January 21, 2015 00:02 IST2015-01-21T00:02:39+5:302015-01-21T00:02:39+5:30

पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत ११.५ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. १० कोटी या निर्धारित लक्ष्यापेक्षा यात मुदतीआधीच वाढ नोंदली

Guinness book entry for public money accounts | जन-धन खात्यांची गिनीज बुकात नोंद

जन-धन खात्यांची गिनीज बुकात नोंद

नवी दिल्ली : पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत ११.५ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. १० कोटी या निर्धारित लक्ष्यापेक्षा यात मुदतीआधीच वाढ नोंदली असून देशातील ९९.७४ टक्के कुटुंबांकडे बँक खाते असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. या योजनेची गिनीज बुकातही नोंद झाली आहे.
पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांना आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचेही कोंदण लागले आहे. २३ आॅगस्ट ते २९ आॅगस्ट २०१४ या आठवड्यात पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत १८,०९६,१३० बँक खाती उघडण्यात आली. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने हा विक्रम केल्याचे गिनीज बुकच्या सन्मानपत्रात म्हटले आहे.
जेटली म्हणाले की, ‘देशातील काही टक्के लोकसंख्येकडेच आता बँक खाती नाहीत. या खात्यात संबंधित ग्राहकांकडून सुमारे ९,०३१ कोटी रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे.’ बँकांनी १६ जानेवारीपर्यंत देशभरात ११.४३ कोटी खाती उघडली. यापैकी ८.२४ कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅगस्टमध्ये या योजनेचा शुभारंभ केला तेव्हा येत्या २६ जानेवारीपर्यंत ७.५ कोटी बँक खाती उघडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. पुढे हे लक्ष्य वाढवून १० कोटी करण्यात आले.
एकट्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ९.११ कोटी खाती उघडली आहेत. यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांचा क्रमांक राहिला.

Web Title: Guinness book entry for public money accounts