शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

गुढीपाडवा...आनंद वाढवा!

गुढीपाडवा...आनंद वाढवा!
नववर्षाच्या स्वागतासाठी सजली उपराजधानी : सामाजिक अस्मितेचा ध्वज उंचावणार

नागपूर : गुढीपाडवा अर्थात हिंदू मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज झाले आहेत. गुढी हे स्वातंत्र्याचे, विजयाचे प्रतीक आहे. विजय ध्वज म्हणून गुढीचा उल्लेख केला आहे. शनिवारी ही गुढी घराघरांसोबत सामाजिक अस्मितेचा ध्वजदेखील उंचावणार आहे. शहरातील जुन्या-नव्या वस्त्यांमध्ये नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी असून पहाटेपासूनच उपराजधानी मंगलमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवसाचे स्वागतच पाडवा पहाट म्हणजे सुमधूर स्वरांच्या मैफिलीने होणार आहे. शहरातील विविध संस्थांनी यांचे आयोजन केले आहे. शिवाय त्यानंतर सकाळच्या सुमारासच महाल, धरमपेठ, रामनगर इत्यादी परिसरात महिलांच्या बाईक रॅलीचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सोबतच विविध चौकांमध्ये सामाजिक समरसतेचा संदेश देणाऱ्या गुढी उभारण्यात येणार आहे. पश्चिम नागपुरातील प्रतापनगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ, बजाजनगर येथे रस्त्याच्या कडेला भगव्या रंगाच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिवाय शहरात मिरवणूका काढण्यात येणार असून यात लेझीम, ढोल, झांज, कीर्तन अशा विविध पथकांचा समावेश राहणार आहे. ज्या मार्गावरून ही स्वागतयात्रा जाणार तेथे भव्य रांगोळ्या साकारण्यात येणार आहेत.

मावळत्या वर्षाला सलाम
शहरातील महिलांमध्ये नव्या वर्षाबाबत विशेष उत्साह दिसून येत आहे. वर्षाच्या शेवटच्या सायंकाळी मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी शहरात विशेष बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सीताबर्डी, महाल, धरमपेठ इत्यादी मार्गावरुन ही रॅली गेली. नऊवारी साडी आणि नथीसह पारंपरिक वेशभूषेत दुचाकी चालवत असलेल्या तरुणी व महिलांच्या उत्साहाला जनतेनेदेखील मोकळा मार्ग देऊन त्यांचे कौतुक केले.

चौकट
संघ स्वयंसेवकांमध्ये विशेष उत्साह
दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त महाल परिसरात विशेष उत्साह दिसून येत आहे. या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे व देशातील सत्ताबदलामुळे संघ स्वयंसेवकांमध्ये यंदा जास्त उत्साह दिसून येत आहे. याचेच प्रतिबिंब या उत्सवानिमित्त दिसून येणार आहे. संघ मुख्यालय तसेच रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातदेखील सरसंघचालकांच्या उपस्थितीत गुढी उभारण्यात येणार आहे. सायंकाळच्या सुमारास रेशीमबाग परिसरात संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने एकत्रित येण्याची शक्यता आहे.