शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात बैलजोडी अनुदान; विशेष घटक लाभार्थींचा ९४ लाख निधी पडून

By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST

कंधार : विशेष घटक योजनेतून लाभार्थींना बैलजोडी खरेदीसाठी प्रत्येकी ३० हजारांचे अनुनदान दिले जाते़ पं़स़ स्तरावर ३१३ लाभार्थ्यांचा ९३ लाख ९० हजारांचा निधी पडून आहे़ परंतु वितरणासाठी शासन निर्णय नसल्याने वाटप रखडले आहे़ त्यामुळे ऐन खरीप हंगामातील पेरणीसाठी लाभार्थ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे़

कंधार : विशेष घटक योजनेतून लाभार्थींना बैलजोडी खरेदीसाठी प्रत्येकी ३० हजारांचे अनुनदान दिले जाते़ पं़स़ स्तरावर ३१३ लाभार्थ्यांचा ९३ लाख ९० हजारांचा निधी पडून आहे़ परंतु वितरणासाठी शासन निर्णय नसल्याने वाटप रखडले आहे़ त्यामुळे ऐन खरीप हंगामातील पेरणीसाठी लाभार्थ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे़
विशेष घटक योजना २०१४-१५ चे ता़उद्दिष्ट्य ३१९ होते़ तरीही ३२७ साध्य असल्याचे समजते़ १२ विहिरी मंजूर असून त्याचे काम चालू आहे़ इतर बाबीत शेती औजारे यंत्र, वखर, २ कोळपे, २ ताडपत्री, १ पेट्रोल फवारा आदी साहित्य लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले़ त्याचे वितरण जवळपास ७० टक्क्यापेक्षा जास्त झाले असून वाटप चालूच आहे़ परंतु बैलजोडी देण्यासाठी ३१३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली़ ९३ लाख ९० हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे़ परंतु वितरण मात्र रखडले आहे़
विशेष घटक योजनेतून अनुसूचित जातीमधील लाभार्थ्यांना शेती व्यवसायासाठी विविध योजनेतूनच शेती साहित्य व बैलजोडी खरेदीसाठी अनुदान दिले जाते़ बैलजोडीसाठी प्रती लाभार्थी अनुदान ३० हजारांचे असते़ मागील वर्षी दुष्काळाने शेतकरी पिचून निघाला आहे़ पिकांची हानी झाली, पशूधनाचे संगोपन करण्यासाठी कसरत झाली़ अनेकांनी सालगडी पद्धत बंद केली़ कारण सालगडी ठेवणे अवघड झाले़ त्यात मागासवर्गीयांचे हाल मात्र वेगळेच आहेत़ भल्या-भल्या शेतकर्‍यांना शेती परवडत नाही़ हे दुष्काळातील स्थितीने सिद्ध झाले़ त्यासाठी विशेष घटक योजनेचा आधार मोलाचा ठरतो़
विशेष घटक योजनेचा निधी उपलब्ध आहे़ परंतु त्याचे वितरण करण्यास शासन निर्णय झाला नाही़ त्यामुळे बारूळ, कौठा, फुलवळ, गऊळ, घागरदरा, कुरुळा, दिग्रस बु़, पेठवडज, घोडज, दिग्रस खु़, आंबुलगा, बहाद्दरपुरा, पानभोसी, चिखलभोसी, बाचोटी, चिखली, मानसपुरी, काटकळंबा, राऊतखेडा, लाडका, आलेगाव, दाताळा, मंगनाळी, शिराढोण, उस्माननगर आदी गावातील ३१३ लाभार्थी बैलजोडीचे अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत़ शासनाने तत्काळ निर्णय घेवून दिलासा देण्याची मागणी लाभार्थीतून केली जात आहे़