शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 17:53 IST

खासगी मालमत्तेला संरक्षण देणाऱ्या एका महत्वाच्या निर्णयावेळी न्यायालयाने हे भाष्य केले आहे. प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 39(b) सोबतच 31(c) ची देखील व्याख्या केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने खासगी मालमत्तेला संरक्षण देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. "सरकार मालमत्तेच्या वितरणासंदर्भात कायदा तयार करू शकते. मात्र, प्रत्येक खासगी मालमत्तेचे अधिग्रहण करण्याची परवानगी देता येणार नाही," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

खासगी मालमत्तेला संरक्षण देणाऱ्या एका महत्वाच्या निर्णयावेळी न्यायालयाने हे भाष्य केले आहे. प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 39(b) सोबतच 31(c) ची देखील व्याख्या केली आहे.

42व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमाने संविधानात बदल करण्यात आला होता - “संविधानाच्या कलम 31(c) मध्ये 42 व्या घटना दुरुस्तीद्वारे 1976 मध्ये सुधारणा करण्यात आली. याद्वारे, धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बनवलेल्या सर्व कायद्यांना संरक्षण देण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा 1972 चा ऐतिहासिक केशवानंद भारती निर्णय, याला मालमत्तेशी संबंधित धोरणाच्या निर्देशात्मक तत्त्वांपुरते मर्यादित करत होता. मालमत्तेच्या वितरणाशी संबंधित ही निर्देशात्मक तत्त्वे कलम 39(b) आणि 39(c) मध्ये दिली आहेत."

मालमत्ता वितरणासंदर्भात तयार होणाऱ्या कायद्याला घटनात्मक संरक्षण असेल -सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने1980 मध्ये मिनर्व्हा मिल्स विरुद्ध भारत सरकार या निर्णयात 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 31(c) मध्ये केलेले बदल रद्द केले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर प्रश्न होता की, मिनर्व्हा मिल्सच्या निर्णयानंतर, कलम 31(सी) संदर्भात केशवानंद भारतीच्या निर्णयात देण्यात आलेली व्यवस्थ कायम झाली होती? 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने याला सहमती दर्शवली आहे. अर्थात, मालमत्तेच्या वितरणासंदर्भात सरकारने केलेल्या कायद्याला घटनात्मक संरक्षण असेल.

महत्वाचे म्हणजे, संविधान निर्मात्यांनी प्रत्येक खाजगी मालमत्तेला सामुदायिक संसाधन म्हटलेले नाही, असे न्यायालयाने आजच्या निर्णयात स्पष्ट केले आहे. यामुळे प्रत्येक मालमत्तेचे आधीग्रहण करण्याची परवानगी सरकारला असू शकत नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयGovernmentसरकार