शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार व्हीआयपी सुरक्षेचा फेरआढावा घेणार

By admin | Updated: July 3, 2014 05:10 IST

केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आधीच्या संपुआ सरकारने सुरक्षा दिलेल्या १५० हून अधिक अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आधीच्या संपुआ सरकारने सुरक्षा दिलेल्या १५० हून अधिक अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन १४ आॅगस्टला संपत आहेत. त्यानंतर सर्व अतिविशिष्ट व्यक्तींना असलेल्या धोक्याचा फेरआढावा घेण्यात येईल आणि राजकीय वजन वापरून सुरक्षा मिळवलेल्यांची नावे व्हीआयपी यादीतून वगळण्यात येतील, असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात ज्या नेत्यांना ‘वाय, झेड किंवा झेड-प्लस’ सुरक्षा प्रदान करण्यात आली. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, मनीष तिवारी, बेनीप्रसाद वर्मा, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचा समावेश आहे. संपुआ सरकारच्या कार्यकाळात पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पी. एस. बाजवा, पक्षाचे अलाहाबादचे लोकसभा उमेदवार नंदगोपाल गुप्ता, उत्तर प्रदेश काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते प्रदीप माथुर, पत्रकार अनिरुद्ध बहल आणि माजी केंद्रीय मंत्री माटंगसिंग यांना सुरक्षा देण्यात आली. शिंदे यांच्या कार्यकाळात भाजपा नेते शाहनवाज हुसेन आणि राजीव प्रताप रुडी, रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ‘झेड’ सुरक्षा प्रदान करण्यात आली. आतापर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही; पण सर्व अतिविशिष्ट व्यक्तींना असलेल्या धोक्याचा फेरआढावा घेतला जाईल आणि त्यानुसार त्यांना सुरक्षा दिली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)