शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पास तरुणांना 'नोकरी'ची सुवर्णसंधी; इंडियन कोस्ट गार्डमध्ये निघाली भरती

By ravalnath.patil | Updated: November 23, 2020 18:01 IST

government jobs : निवड झालेल्या उमेदवारांना 47 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो.

ठळक मुद्देया जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे  दहावीमधील गुण 50 टक्के असले पाहिजेत.

देशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी 18 ते 22 वर्षांपर्यंतचे तरुण अर्ज करू शकतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या नोकरीसाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर चांगला पगार मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 47 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो. कुक, स्टीवर्ड यांसारख्या विविध पदांसाठी भरती असणार आहे.

30 नोव्हेंबरपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होईल
या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवार इंडियन कोस्ट गार्डमध्येच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे  दहावीमधील गुण 50 टक्के असले पाहिजेत. joinindiancoastguard.gov.in ही इंडियन कोस्ट गार्डची अधिकृत वेबसाइट आहे.

एकूण रिक्त पदांची संख्या 50
दहावी उत्तीर्ण उमेदवारांच्या या जागांमधील एकूण रिक्त पदांची संख्या 50 आहे. ज्यासाठी उमेदवार पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. एकूण 50 रिक्त जागांपैकी २० रिक्त जागांमध्ये 5 ईडब्ल्यूएस, 14 ओबीसी, 8 एससी आणि तीन रिक्त जागा एसटीसाठी आहेत. याचबरोबर, या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना वेतन ग्रेड 3 ते 47600 रुपये दरमहा मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना एकदा वाचली पाहिजे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

कोरोना संकट काळात नोकरीच्या संधी 
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 
 

टॅग्स :jobनोकरी