शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

अबकी बार, रोजगारात किरकोळ वाढ; गुजरातची कामगिरी अतिशय सुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 22:21 IST

अनेक राज्यांमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची स्थिती अतिशय वाईट

नवी दिल्ली: देशाची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असताना आता रोजगाराच्या आघाडीवर सरकारच्या समस्या वाढल्या आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) अंतर्गत विविध राज्यांमध्ये निर्माण झालेल्या रोजगारांची आकडेवारी समोर आली आहे. देशात रोजगार निर्मितीची समस्या नसल्याचा दावा मोदी सरकारनं अनेकदा फेटाळला आहे. मात्र सरकारी आकडेवारीनंच आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) ३१ ऑक्टोबरपर्यंत पीएमईजीपीच्या अंतर्गत देशात केवळ २,११,८४० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्रिपुरा, केरळ, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, गुजरात यांची कामगिरी अतिशय सुमार असल्याचं आकडेवारी सांगते. 'एनडीटीव्ही'नं सरकारी कागदपत्रांच्या आधारे याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत त्रिपुरात एकाही व्यक्तीला रोजगार मिळालेला नाही. तर केरळमध्ये केवळ ७२, जम्मू-काश्मीरमध्ये २१६, गुजरातमध्ये २६४, तेलंगणात २५६, राजस्थानात ३१२ आणि दिल्लीत ३६८ जणांना रोजगार मिळाला आहे. पंजाब, झारखंड, छत्तीसगड आणि लक्ष्यद्वीपमधील परिस्थितीदेखील फारशी चांगली नाही. या राज्यांमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत रोजगार प्राप्त झालेल्यांचं प्रमाण ५०० ते २००० च्या दरम्यान आहे. तर महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात (३१ ऑक्टोबरपर्यंत) ६४८८ रोजगार निर्माण झाले आहेत. 



पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृह राज्य असलेल्या गुजरातमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जवळपास फसल्याचं चित्र आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात गुजरातमध्ये १५००८ नोकऱ्या निर्माण झाल्या. मात्र २०१८-१९ मध्ये हा आकडा थेट ६०८ वर आला. यंदाच्या वर्षात रोजगार निर्मिती आणखी रोडावली. ३१ ऑक्टोबरपर्यंत गुजरातमध्ये केवळ २६४ जणांना रोजगार मिळाला आहे. महाराष्ट्रातही गुजरातसारखीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. २०१७-१८ मध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत २६६३२ जणांना रोजगार मिळाला. २०१८-१९ मध्ये हा आकडा १४४०८ वर घसरला. यंदाच्या वर्षात (२०१९-२९) त्यात आणखी घसरण होऊन तो थेट ६४८८ वर पोहोचला आहे. 
 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र