शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांचा हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला खून

By admin | Updated: August 18, 2016 16:52 IST

वंश हत्येवर बंदी घातलेली असतानाच उपडीमध्ये गायींची अवैध वाहतूक करणा-या दोन व्यक्तींवर हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला चढवला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - गोवंश हत्येवर बंदी घातलेली असतानाच उडपीमध्ये गायींची अवैध वाहतूक करणा-या दोन व्यक्तींवर हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. उडपी जिल्ह्यातील हेबरीजवळील काजिके येथे एक व्हॅनमधून तीन गायी अवैधरीत्या नेत असतानाच हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ती व्हॅन रोखली आणि व्हॅनचालकासह असणा-या दुस-या व्यक्तीला बेदम मारहाण केली. हे दोघे जण भाजपाचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आहे. पोलीस अधीक्षक के. टी. बालाकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण पुजारी (29), अक्षय (22) हे दोघे जण एक व्हॅनमधून तीन गायींची वाहतूक करत होते. दरम्यान या घटनेची माहिती हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना समजली आणि त्यांनी रात्री 8.30च्या सुमारास कजीके येथे ही व्हॅन अडवून व्हॅनमधील व्यक्तींना मारहाण केली. ते दोघे त्या गायी कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचा आरोप हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला. हल्ल्यात एका जखमीला ब्रह्मवर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र दुसरा प्रवीण पुजारी याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. पोलिसांना रात्री 11 वाजता या घटनेची माहिती समजली असून, हत्येप्रकरणी हिंदू जागरण वेदिकेचा कार्यकर्ता   श्रीकांतसह 16 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ब्रह्मवर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केल्याची माहिती बालाकृष्णन यांनी दिली आहे.